ताज्या बातम्या

Pune Helicopter Crash : पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं

पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळत आहे. या हेलिकॉप्टर अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळी पावणे सातच्या दरम्यान ही घटना घडली. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅड वरून उड्डाण केल्यानंतर अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळी हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. हा भाग डोंगराळ असल्याने त्याठिकाणी धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलीस आणि इतर यंत्रणा बचावकार्यासाठी पोहोचल्या आहेत.

या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून यात दोन पायलट आणि एक इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात 40 दिवसात दोन हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या घटना घडल्या असून 24 ऑगस्टला देखील पौड येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात