Admin
ताज्या बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यात आता १०० टक्के नोकरभरती होणार

राज्य सरकारने मोठा निर्णय घेत कोरोनामुळे लावलेले नोकरभरती वरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राज्य सरकारने मोठा निर्णय घेत कोरोनामुळे लावलेले नोकरभरती वरील निर्बंध हटवण्यात आले आहेत, त्यामुळे आता राज्यात विविध विभागांमध्ये महाराष्ट्र सरकारी सेवांमधील तब्बल ७५ हजार रिक्तपदे पहिल्या टप्यात भरली जाणार आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75 हजार पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सरकारनं ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्याची मुभा दिली आहे.

आता राज्यात १०० टक्के नोकरभरती होणार आहे. या नोकरभरती अंतर्गत आरोग्य खात्यात १० हजार ५६८, गृह खात्यात ११ हजार ४४३ पदे, ग्रामविकास खात्यात ११ हजार पदांवर भरती होणार आहे. कृषी खातं २ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम खातं ८ हजार ३३७, नगरविकास खाते १ हजार ५००, जलसंपदा खात्यात ८ हजार २२७ पदे, जससंधारण खाते २ हजार ४२३ पदे, पशुसंवर्धन खाते १ हजार ४७ पदे भरली जाणार आहेत. दरम्यान या मुळे राज्यातील तरूणांना रोजगार मिळणार आहे.

गृहविभाग ४९ हजार ८५१ पदे, सार्वजनिक आरोग्य विभाग २३ हजार ८२२, जलसंपदा विभाग २१ हजार ४८९, महसूल आणि वन विभाग १३ हजार ५५७, वैद्यकिय शिक्षण विभाग १३ हजार ४३२, सार्वजनिक बांधकाम विभाग ८ हजार १२ पदे, आदिवासी विभागात ६ हजार ९०७ पदे, सामाजिक न्याय विभाग ३ हजार ८२१ पदे रिक्त आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा