Gautam Adani meets Sharad Pawar 
ताज्या बातम्या

Gautam Adani meets Sharad Pawar : सिल्व्हर ओकवर मोठी भेट! गौतम अदानी शरद पवारांच्या दारी, नेमकं काय शिजतंय?

उद्योगपती गौतम अदानी आज शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही भेट सांत्वनासाठी असल्याचं सांगितलं जात आहे.

Published by : Riddhi Vanne

उद्योगपती गौतम अदानी आज शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही भेट सांत्वनासाठी असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार आजच बारामतीहून मुंबईत आले होते आणि त्यानंतर लगेचच अदानी यांनी त्यांची भेट घेतली.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण वेगाने बदलत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर अदानी–पवार भेटीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.

दरम्यान, अलीकडेच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपणास याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असं स्पष्ट केलं होतं. तसेच १२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार होते, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

थोडक्यात

  1. उद्योगपती गौतम अदानी आज शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले.

  2. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही भेट सांत्वनासाठी असल्याचे सांगितले जात आहे.

  3. शरद पवार आजच बारामतीहून मुंबईत आले होते.

  4. त्यानंतर लगेचच अदानी यांनी त्यांची भेट घेतली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा