ताज्या बातम्या

Indian Passport : नवीन वर्षाच्या आधी भारतीय पासपोर्टला मोठा धक्का ; रँकिंगमध्ये 85 व्या स्थानावर घसरले

भारतीय पासपोर्टला नवीन वर्षाच्या आधी मोठा धक्का बसला आहे. भारतीय पासपोर्ट 2025 मध्ये 80 व्या स्थानावरुन 85 व्या स्थानावर घसरला आहे. तर दुसरीकडे अमेरिकन पासपोर्टला देखील मोठा धक्का बसलाा आहे.

Published by : Varsha Bhasmare

भारतीय पासपोर्टला नवीन वर्षाच्या आधी मोठा धक्का बसला आहे. भारतीय पासपोर्ट 2025 मध्ये 80 व्या स्थानावरुन 85 व्या स्थानावर घसरला आहे. तर दुसरीकडे अमेरिकन पासपोर्टला देखील मोठा धक्का बसलाा आहे. अमेरिकन पासपोर्ट 2025 मध्ये 10 व्या स्थानावरून 12 व्या स्थानावर घसरले आहे.

नुकतंच हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2025 च्या (Henley Passport Index 2025) यादीने जगभरातील पासपोर्टची रँकिंग जाहीर केली आहे. जागतिक स्तरावर भारतीय पासपोर्टचे (Indian Passport) स्थान कमकुवत झाले आहे. गेल्या वर्षी भारत जागतिक क्रमवारीत 80 व्या स्थानावर होता. या वर्षी भारतीय पासपोर्ट पाच स्थानांनी घसरून 85 व्या स्थानावर आला आहे. तर दुसरीकडे सिंगापूरने (Singapore) आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

भारतीय पासपोर्टच्या रँकिंगमध्ये घसरण झाल्यामुळे, भारतीय नागरिक आता जगातील फक्त 56 ते 59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. सिंगापूरचे नागरिक 193 देशांमध्ये, दक्षिण कोरियाचे नागरिक 190 देशांमध्ये, जपानचे नागरिक 189 देशांमध्ये आणि जर्मनी, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंडचे नागरिक 187 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात अशी माहिती हेन्ले पासपोर्ट इंडेक्सने 2025 साठी जारी केलेल्या यादीत दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा