Varanasi Temple Fire News : वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; 9 जण होरपळले, 4 जणांची प्रकृती गंभीर Varanasi Temple Fire News : वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; 9 जण होरपळले, 4 जणांची प्रकृती गंभीर
ताज्या बातम्या

Varanasi Temple Fire News : वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; 9 जण होरपळले, 4 जणांची प्रकृती गंभीर

वाराणसी मंदिर आग: आरतीदरम्यान भीषण आग, 9 जण होरपळले, 4 गंभीर.

Published by : Team Lokshahi

Varanasi Temple Fire News : उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या चौक पोलीस स्टेशन हद्दीतील संकट गली येथील आत्म विश्वेश्वर मंदिरात शनिवारी संध्याकाळी आरतीदरम्यान भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत पूजाऱ्यासह नऊ भाविक गंभीररीत्या होरपळले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर दीनदयाळ उपाध्याय रुग्णालय तसेच महमूरगंज येथील जेएस मेमोरियल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर आत्म विश्वेश्वर मंदिरात शनिवारी संध्याकाळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती सुरू होती. मंदिराला कापसाने विशेष सजावट करण्यात आली होती. याच वेळी आरतीच्या ताटातील एक जळता दिवा खाली पडला. दिव्यातील ज्योत कापसाच्या सजावटीला लागल्याने क्षणार्धात मंदिराच्या आतील भागाला आग लागली. कापसासह शृंगारासाठी वापरलेल्या इतर साहित्यानेही आगीची तीव्रता वाढवली. मंदिरात आग लागल्याची चाहूल लागताच भाविकांमध्ये घबराट पसरली. काहीजण बाहेर पळाले, तर काहीजणांना चेंगराचेंगरीत दुखापत झाली. अपघातात पूजाऱ्यासह नऊ जण गंभीररीत्या भाजले आहेत.

या आगीत जखमी झालेल्यांमध्ये पूजारी प्रिन्स पांडे, बैकुंठनाथ मिश्रा, सानिध्या मिश्रा, सत्यम पांडे, शिवानी मिश्रा, देव नारायण पांडे आणि कृष्णा यांचा समावेश आहे. सर्वांना प्रथम विभागीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने काहींना जेएस मेमोरियल रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी व नंतर रुग्णालयात पोहोचले. आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वेळेत मदतकार्य सुरू झाल्याने मोठा अनर्थ टळला.

श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात कापसाची आणि विविध रंगीत सजावटीची मांडणी करण्यात आली होती. यामुळे आगीचा वेग अधिक वाढला. घटनेनंतर मंदिर परिसरात सुरक्षेचे उपाय वाढवण्यात आले असून, यापुढे अशा प्रकारच्या सजावटीत अग्निसुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाराणसीतील या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, श्रावणातील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

India-China Flight : लवकरच भारत-चीन थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या सूचना

Kangana Ranaut On Jaya Bachchan : "...म्हणून लोक तिचे नखरे सहन करतात", जया बच्चन यांच्या त्या कृतीवर कंगना रनौतची 'भांडकुदळ कोंबडी' म्हणत टीका

Dadar Kabootarkhana :दादरमध्ये आंदोलन चिघळलं; आंदोलनात गोंधळ, पत्रकारांवर पोलिसांची आरेरावी

Latest Marathi News Update live : दादरमधील कबुतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन