ताज्या बातम्या

Ajit Pawar : कामाचा माणूस अखेरच्या श्वासापर्यंत; बारामतीत अजित पवार अनंतात विलीन

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Published by : Varsha Bhasmare

राज्याच्या राजकारणात गेल्या साडेचार दशकांपासून झंझावात निर्माण करणारे, आपल्या रोखठोक आणि स्पष्ट शैलीने मित्र-शत्रू दोघांनाही चकित करणारे, तसेच कामाचा माणूस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ओळख जपणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज (दि. २९ जानेवारी) अनंतात विलीन झाले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मंत्राग्नि दिला. या क्षणी अवघ्या बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती.

रोखठोक बोलणं, निर्णयक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे अजित पवार हे कायम चर्चेत राहिले. त्यांच्या जाण्याने केवळ एका नेत्याची नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक युगाची सांगता झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.त्यांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मंत्राग्नि दिला. या क्षणी अवघ्या बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती.

ग्रामीण महाराष्ट्राशी घट्ट नाळ जोडलेला नेता, दिलेला शब्द कधीही न मोडणारा आणि स्वतःसाठी राजकीय विद्यापीठ उभं करणारा अजित पवार आज निपचित पडले आहेत, हे दृश्य अनेकांच्या काळजाला चिरणारे होते. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात समर्थकांनी **“अजित दादा अमर रहे”**च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकला. महिलांसह कार्यकर्त्यांचा आक्रोश, वाहणारे अश्रू आणि हतबल चेहरे हे अजितदादांवरील प्रेमाची साक्ष देत होते. नेहमी खडसावणारे, प्रसंगी रागीट वाटणारे पण गरजूंना मदतीसाठी धावणारे दादा आज आपल्यात नाहीत, याची जाणीव प्रत्येकाला अस्वस्थ करून गेली.

अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात विशेष चबुतरा उभारण्यात आला होता. या ठिकाणी पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची उपस्थिती होती. वातावरण इतके भावूक झाले होते की अनेक कार्यकर्त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले.

कुटुंबीयांकडून अंत्यदर्शन

अजित पवार यांचे पार्थिव सकाळी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ येथे जमा झाले होते. या अभूतपूर्व गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठीही आव्हान ठरले. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली. काटेवाडीत श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. यावेळी पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या भगिनी, सून तसेच कुटुंबातील सदस्यांनी जड अंतःकरणाने अंत्यदर्शन घेतले.

राजकीय दिग्गजांची उपस्थिती

अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून राजकीय नेते बारामतीत दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नबिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, छगन भुजबळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आंध्र प्रदेशमधील मंत्री नारा लोकेश, गिरीश महाजन, रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोऱ्हे, अदिती तटकरे, पंकजा मुंडे, गणेश नाईक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रफुल्ल पटेल, रितेश देशमुख, अमोल कोल्हे यांच्यासह असंख्य मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा