ताज्या बातम्या

Mumbai Bandra Fire : वांद्र्यामध्ये शोरूमला भीषण आग, आसपासच्या परिसरात खळबळ

वांद्र्याच्या लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूमला लागलेल्या भीषण आगीने परिसरात खळबळ, 15 अग्निशमन गाड्या घटनास्थळी.

Published by : Prachi Nate

मुंबईमधील वांद्र्याच्या लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूममध्ये पहाटे भीषण आग लागली आहे. यादरम्यान अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनेची माहिती कळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थिचे प्रयत्न करत आहे. घटनास्थळावर अग्निशमन दल, मुंबई पोलिस, अदानी इलेक्ट्रिसिटी, पीडब्ल्यूडी आणि स्थानिक वॉर्डचे कर्मचारी आहेत.

आग इतकी भीषण आहे की आगीमध्ये शोरूमचे मोठे नुकसान झाले आहे. बीएमसीकडून आलेल्या माहितीनुसार पहाटेच्या वेळेस वांद्रे येथील लिंकिंग रोडवरील तीन मजली बिझनेस पार्क असलेल्या लिंक स्क्वेअर मॉलच्या तळमजल्यावर असेलल्या क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात नागरिकांनी गर्दी केली असून खळबळ उडाली आहे.

तसेच या आगीमुळे शोरूममधून काळ्या धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर येत असल्यामुळे शोरुमच्या बाहेर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान नागरिकांमध्ये गोंधळ उडत असल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या विनंती नंतर एनडीआरएफ तुकडीला पाचारण केले. तसेच चार तासांपासून अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून नजीकच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू