सध्या देशभरात अनेक अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. नुकतच उत्तराखंडातील देवभूमी उत्तरकाशीमध्ये मंगळवारी जोरदार ढगफुटी आणि भूस्खलन झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. धराली गावात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत मुसळधार पावसामुळे खीरगंगा नदीला अचानक पूर आला आणि अनेक घरे, इमारती वाहून गेल्या किंवा मातीखाली गाडल्या गेल्या.
अशातच आता हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला भीषण आग लागली. हिंगोली रेल्वे स्थानकात एका बाजूला हा जुना डबा उभा होता. अचानक त्यातून धूर निघू लागला. यानंतरही आग नमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अपष्ट आहे. दरम्यान अग्निशामक दल दाखल घटनास्थळी पोहटले असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. तसेच या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीचे कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे.