भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतही मॉक ड्रिल घेण्यात आलं. अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन लगतच्या जोशी मार्केटमध्ये मॉक ड्रिल करण्यात आलं. शहरात दहशतवादी शिरले किंवा बॉम्ब स्फोट झाला तर कशा प्रकारे परिस्थिती हाताळता येईल याचा सराव करण्यात आला.
आपतकालिन परिस्थिती उद्भवल्यास किती वेळात पोलीस घटनास्थळी येतील व नेमकं लोकांना यावेळी काय करायचं याची देखील माहिती लोकांना देण्यात आली. दरम्यान अचानक बंदूकधारी पोलीस या जोशी मार्केटमध्ये भल्या मोठा ताफा घेऊन आल्याने नागरिक देखील काही वेळ भयभीत झाले होते.
मात्र हा मॉक ड्रिल असून अचानक अशी परिस्थिती उद्भवल्यास काय करावे, हे सांगण्यासाठी साकारण्यात आलेले एक नाटक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तेथील लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.