ताज्या बातम्या

Crime News : भयंकर! मायलेकीनं मिळून रचला मुलाच्या मृत्यूचा कट; पोलिसांनी हिसका देतात सांगितली हकीकत

सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईने आणि बहिणीनेच आपल्या मुलगा व भावाचा निर्घृण खून करून मृतदेहाला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Published by : Rashmi Mane

सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईने आणि बहिणीनेच आपल्या मुलगा व भावाचा निर्घृण खून करून मृतदेहाला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना अपघाती आगीमुळे घडल्याचा बनाव त्यांनी केला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे खऱ्या घटनेचा उलगडा झाला.

मयूर रामचंद्र माळी (वय 30) हा तरुण तासगावमधील कासार गल्ली येथील रहिवासी होता. तो सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होता. शुक्रवारी रात्री तो मित्रांसोबत गप्पा मारून घरी परतला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारी त्याच्या घरात अचानक आग लागल्याची माहिती मिळाली. तासगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यात आली, मात्र घरामध्ये मयूरचा जळालेला मृतदेह आढळून आला.

सुरुवातीला ही घटना अपघाताची वाटत होती. मात्र शवविच्छेदन आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पोलिसांना संशय आला. चौकशीत मयूरची आई संगीता (वय 50) आणि बहीण काजल (वय 19) या दोघींनी गुंगीचे औषध देऊन त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मयूरचा आई आणि बहिणीसोबत वारंवार वाद होत असल्याचे निष्पन्न झाले असून, या पार्श्वभूमीवरच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तासगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयूरच्या सामाजिक कार्यामुळे त्याचा परिसरात चांगला प्रभाव होता. त्यामुळे त्याच्या मृत्युने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा