ताज्या बातम्या

Biometric e-Passport Service : भारताची बायोमेट्रिक ई-पासपोर्ट सेवा सुरू; परदेशी प्रवास करणं होणार सोपं

बायोमेट्रिक ई-पासपोर्ट: भारतात प्रवास प्रक्रिया सोपी, सुरक्षित आणि जलद; तंत्रज्ञानात नवे युग.

Published by : Team Lokshahi

भारत सरकारने तंत्रज्ञान क्षेत्रात आतापर्यंत अनेक बदल केले आहेत. त्यातच आता एक नवीन निर्णय घेत ई-पासपोर्टची सेवा सुरु करण्यात आली आहे. भारत सरकारने अधिक सुरक्षित आणि जलद ओळख प्रक्रियेसाठी मायक्रोचिप-सक्षम ई-पासपोर्ट सेवा सुरू केली आहे. भारत सरकारने ही सेवा सुरू करून तंत्रज्ञानाचं एक नवीन युग सुरू केला आहे.

भारताबाहेर प्रवास करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट आहे. पासपोर्टशिवाय तुम्ही कोणत्याही देशात जाऊ शकत नाही. पासपोर्ट तयार करण्यासाठी फॉलो करावी लागणारी प्रोसेस थोडी किचकट आहे, त्यामुळे बरेचं लोकं असे आहेत की जे ही प्रोसेस फॉलो करावी लागू नये म्हणून पासपोर्ट बनवतच नाही. पण आता तुम्हाला ही किचकट प्रोसेस फॉलो करण्याची गरज नाही. भारतात ई पासपोर्ट सर्विस सुरु करण्यात आली आहे. पासपोर्ट प्रणाली अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ई पासपोर्ट सर्विसचे अनेक फायदे आहेत. ई- पासपोर्टमुळे प्रवाशांची ओळख सुरक्षित राहणार आहे. याशिवाय इंटरनॅशनल प्रवासात देखील मदत मिळणार आहे.

यामध्ये एक खास माइक्रोचिप लावलेली असते. या चिपमध्ये तुमची वैयक्तिक माहिती, तसेच बायोमेट्रिक डिटेल्स देखील सेव्ह केलेल्या असतात. जसं की फोटो, फिंगरप्रिंट इत्यादी. हा संपूर्ण डेटा सुरक्षित पद्धतीने एन्क्रिप्टेड असतो. हा डेटा केवळ अधिकृत स्कॅनिंग सिस्टमद्वारेच वाचला जाऊ शकतो. ई-पासपोर्टद्वारे परदेशात प्रवास करणारे भारतीय नागरिक आता इमिग्रेशन चेकपॉइंट्सवर जलद, स्वयंचलित आणि संपर्करहित प्रक्रियेतून जाऊ शकतील. ई-गेट्समुळे लांब रांगांची गरज कमी होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुरळीत होईल. पासपोर्ट प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस होण्यास यामुळे मदत होणार आहे. शिवाय, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाची जागतिक ओळखही मजबूत होईल यात शंका नाही.

अमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स, जर्मनी, यूके, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांसारखे देश आधीच ई-पासपोर्ट वापरत आहेत. भारताच्या या पावलामुळे, आता भारतीय नागरिकांना त्या देशांमध्ये प्रवेश करताना अधिक आदर आणि सुविधा मिळेल. भारताच्या काही निवडक शहरांमध्ये सध्या ई-पासपोर्ट सेवा सुरु करण्यात आली आहे. या शहरांमध्ये नागपुर, चेन्नई, जयपुर, दिल्ली, हैदराबाद, रांची, शिमला, भुवनेश्वर, गोवा आणि जम्मू इत्यादींचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाची योजना आहे की, 2025 च्या मध्यापर्यंत ही सेवा संपूर्ण देशात लागू केली जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला सरकारने सुरु केलेल्या या सर्विसचा फायदा मिळू शकणार आहे.तुम्हीही नवीन पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर ई-पासपोर्टसाठी अर्ज करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा