ताज्या बातम्या

Dombivli Cultural News : गडकरी मागोमाग आता सावित्रीबाई फुले नाट्यगृह ही बंद, छताचा एक भाग कोसल्यामुळे घेतला निर्णय

डोंबिवली नाट्यगृह बंद: सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या छताचा भाग कोसल्यामुळे तातडीने बंद.

Published by : Team Lokshahi

सांस्कृतिक पंरपराचा वारसा असलेल्या डोंबिवली शहरात नाट्यरसिकांची रेलचेल पाहायला मिळते. 18 वर्ष जुने असलेले डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृह नेहमीच नाट्यरसिकांनी भरलेले दिसते. अनेकवेळा नाट्यगृहाबाहेर हाउसफुलचा बोर्ड लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायत हे दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. त्यामुळे अनेक मोठमोठी नाटके आणि मोठमोठे कलाकार या निमित्ताने डोंबिवली आणि कल्याण च्या नाट्यगृहात येत आहेत. त्यामुळे शहरात नाट्यरसिकांना विविध मोठमोठी नाटके पाहायला मिळत होती.

शुक्रवारी अचानक सावित्रीबाई नाट्यगृहाच्या सिलिंगचा काही भाग कोसल्यामुळे या नाट्यरसिकांच्या आनंदावर विरजण पडले. सुदैवाने त्यावेळेस नाट्यगृहात कोणता ही नाट्यप्रयोग न्हवता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सिलिंगचा भाग कोसळल्यानंतर केडीएमसीच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली. केडीएमसीच्या शहर अभियंता अनिता परदेशी प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, मनोज सांगळे यांनी पाहणी करून त्याचा अहवाल स्ट्रँक्टचरल इंजिनियरला सादर करण्याचे आदेश दिला.

या अहवालानुसार छताचे सांगाडे गांजलेले आणि कमकुवत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिनव गोयल तातडीने काम सुरु करण्यासाठी मंजुरी दिली असून दुरुस्तीसाठी काम होईपर्यंत नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासंदर्भात नाट्यगृहाची दुरुस्ती होईपर्यंत नाट्यरसिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. नाट्यकर्मी आणि नाट्यरसिकांच्या सुरक्षितेसाठी १५ जुनपर्यंत' सावित्रीबाई नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश पालिकेतर्फे देण्यात आले आहे. यामुळे सुट्टीच्या काळात पालिकेच्या यानिर्णयामुळे नाट्यकर्मी आणि नाट्यरसिकांची नाराजी पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली