Thane Mayor 
ताज्या बातम्या

Thane Mayor : अखेर ठरलं! ठाणे महानगरपालिकेचा महापौरपदी शर्मिला पिंपोळकर तर उपमहापौरपदी 'या' नेत्याची नियुक्ती

ठाणे महापालिकेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. तब्बल तीन वर्षांनंतर लोकनियुक्त महापौरांची निवड झाली असून, शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपोळकर-गायकवाड यांनी ठाण्याच्या पहिल्या नागरिकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Published by : Riddhi Vanne

ठाणे महापालिकेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. तब्बल तीन वर्षांनंतर लोकनियुक्त महापौरांची निवड झाली असून, शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपोळकर-गायकवाड यांनी ठाण्याच्या पहिल्या नागरिकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या सोबत भाजपचे कृष्णा पाटील उपमहापौर झाले आहेत. दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या.

विशेष सभेत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पिठासीन अधिकारी म्हणून निवडीची अधिकृत घोषणा केली. महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने महायुतीकडून शर्मिला पिंपोळकर यांचे नाव पुढे करण्यात आले होते. विरोधात उमेदवार नसल्याने निवड सहज पार पडली.

प्रशासकीय राजवट संपून पुन्हा एकदा महापालिकेत लोकप्रतिनिधींचे नेतृत्व सुरू झाले आहे. महापालिका इमारत सजवण्यात आली होती, तर सभागृहात आनंदाचे वातावरण दिसून आले. पदभार स्वीकारल्यानंतर महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. शहरातील वाहतूक, पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत आनंद साजरा केला. ठाण्यात पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सव पाहायला मिळाला.

थोडक्यात

  1. ठाणे महापालिकेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला.

  2. तब्बल तीन वर्षांनंतर लोकनियुक्त महापौरांची निवड

  3. शिवसेना शिंदे गटाची शर्मिला पिंपोळकर-गायकवाड महापौरपदावर निवडली.

  4. ठाण्याच्या पहिल्या नागरिकपदाची जबाबदारी शर्मिला पिंपोळकर-गायकवाड यांनी स्वीकारली.

  5. भाजपचे कृष्णा पाटील उपमहापौर म्हणून निवडले गेले.

  6. दोन्ही पदांसाठी निवड बिनविरोध झाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा