संगीतकार ए. आर. रेहमान यांना रविवारी सकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना चेन्नईतील ग्रीम्स रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. आता ए.आर. रेहमान यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ए.आर. रेहमान यांना काहीवेळापुर्वी रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ए आर रेहमान यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीबद्दल माध्यामांना माहिती दिली. तो म्हणाला की, "ए आर रेहमान यांना नुकतेच घरी सोडण्यात आले आहे.आज सकाळी त्यांना छातीत दुखत असल्याने रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी विविध चाचण्या केल्या होत्या. त्यांचे सर्व रिपोर्ट चांगले आले असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. त्यांची प्रकृती ठिक आहे".
ए आर रेहमान यांच्या मानेमध्ये दुखत होते. त्यामुळे त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. अनेक चाचण्या केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. त्यांना रुग्णलयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रहमान आता पुर्णपणे ठिक असून काळजी करण्यासारखे काही नसल्याचे ए.आर. रेहमान यांच्या मॅनेजरने माहिती दिली आहे. दरम्यान ए. आर. रहमान यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, 'छावा' चित्रपटाला ए आर रेहमान यांनी संगीत दिले होते.