Pahalgam Crime : धक्कादायक! पहलगामच्या एका हॉटेलमध्ये 70 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार Pahalgam Crime : धक्कादायक! पहलगामच्या एका हॉटेलमध्ये 70 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार
ताज्या बातम्या

Pahalgam Crime : धक्कादायक! पहलगामच्या एका हॉटेलमध्ये 70 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार

पाहलगाम गुन्हा: 70 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत!

Published by : Team Lokshahi

70-year-old Grandmother Sexually Assaulted In Pahalgam : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेल्या 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. 11 एप्रिल 2025 रोजी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिला पहलगाममध्ये एका हॉटेलमध्ये थांबली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, झुबैर अहमद नावाच्या व्यक्तीने महिलेच्या खोलीत जबरदस्ती प्रवेश केला, तिला ब्लँकेटने झाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर महिला गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

झुबैर अहमद हा पहलगाममधीलच स्थानिक रहिवासी असून, पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. या प्रकरणाची सुनावणी 30 जून रोजी अनंतनाग जिल्हा न्यायालयात झाली. आरोपीने न्यायालयात आपल्यावर लावलेले आरोप फेटाळले. त्याचा दावा होता की, पोलिसांनी खोट्या प्रकरणात अडकवलं असून पीडित महिलेसोबत आपला कोणताही संबंध नाही. तसेच, पीडित महिलेने आपल्याला ओळखलंही नाही, असंही त्याने न्यायालयात सांगितलं. मात्र, न्यायालयाने आरोपीच्या युक्तिवादावर विश्वास न ठेवता जामीन फेटाळला. कोर्टाने स्पष्टपणे नमूद केलं की, या घटनेतील मानसिकता अत्यंत विकृत असून, समाजात अशा व्यक्तींना मुक्त सोडणे धोकादायक आहे.

या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनावर आणि पर्यटन स्थळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी आणि पर्यटक, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा