Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये ढगफुटीचा कहर; पुण्यातील 19 पर्यटक बेपत्ता Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये ढगफुटीचा कहर; पुण्यातील 19 पर्यटक बेपत्ता
ताज्या बातम्या

Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये ढगफुटीचा कहर; पुण्यातील 19 पर्यटक बेपत्ता

उत्तरकाशीतील धारली गावाजवळ ५ऑगस्ट रोजी भीषण ढगफुटी झाली. पुण्याच्या आंबेगाव १९ जणांचा दहावी बॅचचा गट १ ऑगस्टला पर्यटनासाठी निघाला, मात्र त्यांचा संपर्क अजूनही लागत नाही.

Published by : Team Lokshahi

Uttarakhand Cloudburst: Maharashtra Tourists Trapped, know details उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धारली गावाजवळ 5 ऑगस्ट रोजी भीषण ढगफुटी झाली. या नैसर्गिक आपत्तीत काही ठिकाणी मृत्यूची नोंद झाली असून अनेकजण बेपत्ता आहेत. ढगफुटीनंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक पर्यटक आणि स्थानिक रहिवासी सध्या त्या भागात अडकले असून, बचावकार्य सुरू आहे.

महाराष्ट्रातून गेलेले अनेक पर्यटक सध्या त्या भागात अडकल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः पुणे, सोलापूर आणि नांदेड येथील नागरिक या दुर्घटनेच्या वेळी त्या भागात उपस्थित होते. त्यातच पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 1990च्या दहावी बॅचमधील 19 जणांचा एक गट 1 ऑगस्ट रोजी उत्तराखंडला पर्यटनासाठी रवाना झाला होता. या गटात 8 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. या पर्यटकांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला होता. सकाळी काही सदस्यांनी फोटो आणि स्टेटस शेअर केल्याचे नोंदवले गेले होते, परंतु त्यानंतर संपर्क तुटलेला आहे. काल या गटातील एका महिलेनं तिच्या मुलाशी फोनवर संपर्क साधून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही.

सोलापूर येथून गेलेले चार तरुणही सध्या गंगोत्री परिसरात अडकल्याचे समजते. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले आणि मल्हारी धोटे अशी या तरुणांची नावे आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून आपली सुरक्षितता सांगितली होती. पण त्यानंतर त्यांचाही संपर्क तुटला आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन उत्तराखंड प्रशासनाशी समन्वय साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एनडीआरएफने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सध्या तरी कोणतीही जीवितहानी सोलापूरच्या व्यक्तींबाबत नोंदवलेली नाही दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील 11 पर्यटक उत्तरकाशीमधील खराडी गावात सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्क कार्यालयाने याबाबत थेट संवाद साधला असून, पर्यटकांच्या नातेवाईकांनी दिलासा मिळाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत राहुल गांधींचा मोठा खुलासा; म्हणाले...

Devendra Fadnavis : "टार्गेट केलं गेलं..." मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा

Mumbai Kabutar Khana Hearing : कबुतरखान्यांवरील बंदीवर कोर्टाचा मोठा निर्णय! कबूतरांच्या अन्नपाण्यावर स्थगिती कायम

Narali Poornima 2025 : नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते? , जाणून घ्या..