Delhi Crime : मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार; आईची पोलिसात धाव, मुलाला अटक Delhi Crime : मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार; आईची पोलिसात धाव, मुलाला अटक
ताज्या बातम्या

Delhi Crime : मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार; आईची पोलिसात धाव, मुलाला अटक

दिल्ली धक्का: 65 वर्षीय आईवर मुलाकडून अत्याचार, मुलाला अटक.

Published by : Riddhi Vanne

राजधानी दिल्लीमध्ये आई–मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम मुलाने स्वतःच्या ६५ वर्षीय आईवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय आरोपी मुलाने आपल्या आईवर वारंवार मानसिक दबाव टाकत वडिलांपासून वेगळं होण्यासाठी भाग पाडलं. आईच्या चारित्र्यावरही आक्षेप घेत तिच्यावर चरित्रहीन असल्याचा आरोप करून तिला घटस्फोटासाठी जबरदस्ती केली. या अमानुष वर्तनानंतर नराधम मुलानं हद्द ओलांडत स्वतःच्या आईवरच दोन वेळा अत्याचार केला.

पीडित आईने धैर्य दाखवत अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे. सध्या पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

या घटनेमुळे दिल्लीसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आई–मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकाराने समाजमन सुन्न झालं आहे. वृद्ध आईवरच अत्याचार करणाऱ्या मुलाच्या कृत्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Governor of Maharashtra : मोठी बातमी!, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन ठरले NDAचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

Wardha Crime : वर्ध्यात धक्कादायक घटना; 28 वर्षीय युवकाकडून वृद्ध महिलेवर अत्याचार

Ajit Pawar on Bacchu kadu : 'पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करा, आरोप नको', पवारांचा बच्चू कडूंना सल्ला