ठाण्यात नर्सिंग कोर्सच्या विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. ठाण्यामध्ये एका इन्स्टिट्यूटने जनरल नर्सिंग मिडवायफरी कोर्सचा फायदा घेत नर्सिंग कोर्सच्या विद्यार्थ्यांना फी घेऊन गंडवलं आहे. विद्याथ्यर्थ्यांकडून लाखोंची फी घेऊन नंतर कोणतेही प्रमाणपत्र आणि निकाल न देता अचानक इन्स्टिट्यूट बंद केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या विद्याथ्यर्थ्यांची मूळ कागदपत्रेही इन्स्टिट्यूटने स्वतःकडे ठेवली त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात येण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे.
तब्बल 33 लाखांची फसवणूक
यामध्ये 22 विद्यार्थ्यांची 33 लाख 17 हजार 850 रुपयांची फसवणूक करण्यात अशी माहिती समोर आली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कोर्ससाठी 2 लाख 32 हजार, 1 लाख 80 हजार, दीड लाख अशा वेगवेगळ्या रकमा मोजल्या आहेत. या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही अधिकृत माहिती दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या घटनेनंतर इन्स्टिट्यूटचा संस्थापक, मालक आणि इतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आली आहे.
इन्स्टिट्यूटचा खोटा दावा, अन् विद्यार्थांना लागला मोठा फटका
विद्याथ्यर्थ्यांनी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्राची मागणी केली असता, इन्स्टिट्यूटने त्यांना डिसेंबरपर्यंत गुणपत्रिका आणि नंतर प्रमाणपत्र मिळेल असं सांगितलंहोत. त्यानंतर डिसेंबर महिना उलटल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा गुणपत्रिका आणि प्रमाणपत्राची मागणी केल्याबरोबर इन्स्टिट्यूटने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या नोंदणीच्या नावाखाली विद्याथ्यर्थ्यांकडून 20 हजारांची मागणी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा निकाल आणि प्रमाणपत्राची मागणी केली असता इन्स्टिट्यूटनकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता इन्स्टिट्यूटनचा फोन बंद होता. अशी माहिती समोर आली आहे.
हा असा प्रकार पहिल्यांदा न घडता याआधी देखील असे अनेक प्रकार घडले आहेत. ठाण्यात तीन महिन्यापूर्वी एका नामांकित क्लासकडूनही फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. विद्यार्थांकडून फी घेतल्यानंतर मध्येच क्लास बंद करण्यात आला, याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले. याप्रकरणी देखील त्या क्लासच्या मुख्य संचालकासह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या क्लासने 80 हून अधिक विद्यार्थ्यांकडून तब्बल तीन कोटीपेक्षा जास्त फी जमा केली होती.