बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेश जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये 05 लाख रुपये अडकले होते. मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. रात्री उशिरा कुटुंबासह बँकेत गेलेले जाधव, काही वेळातच बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मल्टीस्टेट बँकांची विश्वासार्हता पुन्हा एकदा समोर आली आहे.