Dhule Crime : 'ते' फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने 20 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल  Dhule Crime : 'ते' फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने 20 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
ताज्या बातम्या

Dhule Crime : 'ते' फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने 20 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

धुळे शॉकिंग: व्हायरल भीतीने 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या

Published by : Riddhi Vanne

Shocking incident in Dhule : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ताजपुरी गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बंटी ऊर्फ किशन जितेंद्र सनेर (वय 20 वर्षे) या तरुणाने मोबाईल हॅक झाल्याच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, किशन याच्या मोबाईलमध्ये एक APK फाईल इंस्टॉल करण्यात आली होती. संबंधित फाईलमुळे त्याचे WhatsApp हॅक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, मोबाईलमधील काही आक्षेपार्ह फोटो गावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर आणि काही मोबाईल नंबरवर व्हायरल झाल्याची भीती किशनला वाटत होती. या मानसिक तणावाखाली किशनने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघन पाटील यांनी सांगितले की, मोबाईलमध्ये आढळून आलेली APK फाईल संशयास्पद असून, पुढील सायबर तपास सुरू आहे. किशन हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, किशनच्या आत्महत्येने परिसरात शोककळा पसरली आहे.

या निमित्ताने पोलीस प्रशासनाकडून युवकांना आवाहन करण्यात येत आहे की, मोबाईलमधील अज्ञात फाईल्स डाउनलोड करण्यापूर्वी सतर्कता बाळगा व सोशल मिडियावरील गोष्टींचा विचारपूर्वक वापर करा. अशा घटनांची माहिती त्वरित पोलिसांशी शेअर करावी.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Maratha Protest : ...पोलीसही गायब, आंदोलनात रात्रीच्या वेळेस खळबळ! संशयित व्यक्तीकडून जरांगेंचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Update live : आज सकाळी 10 वाजता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक

Manoj Jarange Maratha Protest : मराठा आंदोलनात आणखी एका मराठा बांधवाचा गेला जीव; जरांगेंसह सर्व आंदोलकांमध्ये शोककळा आणि संतापाची लाट

Israel Air Strike On Yemen : येमेनमध्ये इस्रायलच्या एअर स्ट्राइकचे थैमान; अनेक मंत्र्यांसह हौथी सरकारचे पंतप्रधान ठार