प्रियकराने प्रेयसीच्या चितेवर उडी घेऊन स्वतःचे आयुष्य संपवण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी नागपुरमध्ये उघडकीस आला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ज्या मुलीचे निधन झाले त्या मुलीच्या नातेवाईकांनी या प्रियकराचा असा प्रताप पाहुन संतापाच्या भरात त्या मुलाला मारहाण केली.
कन्हाळ नदीच्या घाटावर एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यामधील 19 वर्षीय तरुणीने 8 जुन रोजी गळफास घेत आपलं जीवन संपवल. अंकिता, अनुराग असे या तरुण आणि तरुणीचे नाव असुन त्या दोघांमध्ये मैत्री होती. मात्र काही किरकोळ वादामुळे आणि मैत्रीसाठी अडसर निर्माण होत असल्यामुळे त्या मुलीने नैराशेमध्ये येऊन राहत्या घरी गळफास घेतला.
माझ्या मृत्यूसाठी अनुरागला जबाबदार धरू नये अशी चिठ्ठी ही लिहिली होती. आधीच मुलीच्या अशा अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अंकिताचे शव विच्छेदन पार पडल्यानंतर सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र तिचे अंत्यसंस्कार चालू असताना तिचा मित्र अनुराग मेश्राम अचानक तेथे आला आणि त्याने चितेवरवर उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला.
यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्याला बेदम चोप दिला मात्र त्या नंतर अनुरागच्या वडिलांनी आणि भावाने त्याला लगतच्या रुग्णालयात दाखल केले. त्याने जेव्हा चितावर उडी घेतली तेव्हा त्याने काहीतरी पदार्थ प्राशन केला असावा असा पोलिसांचा संशय आहे. नागपुर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.