ताज्या बातम्या

पुण्यात धक्कादायक घटना! गेम खेळण्याचा मोह जीवावर बेतला, १४ व्या मजल्यावरून उडी मारून मुलानं संपवलं जीवन

पिंपरी चिंचवड शहरातील किवळे येथे एक धक्कादायक घटना घडली. रुणाल गेटवे हाउसिंग सोसायटीतील उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने गेम खेळण्याचा टास्क पूर्ण करताना इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

Published by : Team Lokshahi

पिंपरी चिंचवड शहरातील किवळे येथे एक धक्कादायक घटना घडली. रुणाल गेटवे हाउसिंग सोसायटीतील उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने गेम खेळण्याचा टास्क पूर्ण करताना इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आर्य उमेश श्रीराव असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. आर्य इयत्ता नववीत शिक्षण घेत होता. गेम खेळण्याच्या नादात आर्यने आत्महत्या केल्यानं त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, आर्य हा नववीत शिकणारा अतिशय हुशार मुलगा होता. त्याची आई गृहिणी आहे तर वडिल नोकरी करतात. वडिल घरी नसल्या कारणाने आणि आई घरकामात व्यस्त असल्यामुळे मुलगा घरात एकटा पडला होता. त्याच्यासोबत बोलायला, खेळायला आणि वेळ घालवायला कोणी नव्हतं. त्यामुळे आर्यला ऑनलाईन गेमचं वेड लागलं ज्यामुळे तो एकटाचं त्याच्या खोलीत तासंतास बसून राहायचा.

गेममुळे त्याचं कोणासोबत बोलणं चालणं नसायचं यामुळे आर्यची आई चिंतेत राहू लागली आणि तिने त्याच्या वहिलांना भारतात बोलवून घेतलं. आर्यचे वडिल भारतात आल्यानंतर आर्य वडिलांसोबत वेळ घालवू लागला, ज्यामुळे त्याची गेम खेळायची सवय थोडीफार कमी झाली होती. पण ज्यावेळेस त्याचे वडिल पुन्हा परदेशात कामानिमित्त निघून गेले त्यानंतर तो पुन्हा ऑनलाईन गेमच्या आहारी गेला. जेवणासाठी ही त्याला विनवण्याकरून बोलवायला लागायचं. त्याचं मित्रांसोबत बाहेर खेळायला जाणं ही कमी झालं होत, आणि त्याने स्वत:ला त्याच्या खोलीच्या चार भिंतीत कोंडून घेतलं होत. 25 जुलैला झालेल्या पावसाच्या जोरदार वृष्टीमुळे शाळा आणि कॉलेजांना सुट्टी जाहीर केली होती.

त्यादिवशी ही आर्यने तो पुर्ण दिवस गेम खेळण्यात घालवला. रात्री त्याची आई लहान मुलाची तबेत ठिक नसल्याकारणाने मुलाजवळ बसली होती तितक्यात सोसायटीच्या व्हाट्सॲप ग्रुपवर एक मुलगा जखमी अवस्थेत बिल्डिंगवरून खाली पडल्याचा मेसेज आला तो मेसेज पाहताच आर्यची आई त्याच्या खोलीच्या दिशेने गेली आणि खोलीत तो नव्हता, त्यामुळे त्याची आई धावत बिल्डिंगच्या खाली गेली आणि आपल्याच मुलाचा मृतदेह रक्तबंम्बाळ झालेला पाहून आर्यच्या आईला मोठा धक्का बसला ही बातमी त्याच्या वडिलांना कळताच त्याचे वडिल ही भारतात परतले. या घटनेदरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीवरून समजले की, आर्यने एका कागदावर गेमच्या कोडिंगच्या भाषेत काही तरी लिहले होते. पण ती गेमची कोडिंग भाषा असल्यामुळे त्याला नेमक काय सांगायचं होत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

KL Rahul : कर्णधार आणि उपकर्णधार अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीम इंडियाची धुरा

Marathwada Grains Rate : मराठवाड्यात खरीप हंगामात सोयाबीन आघाडीवर; कापूस स्थिर, ऊस व ज्वारी क्षेत्रात मोठी घट; तूर-उडीद कायम

Hotel and restaurant strike : 14 जुलैला राज्यातील हॉटेल-रेस्टॉरंट बंद ; अवाजवी करामुळे संघटनेचा इशारा