रविवारी दुपारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा या प्रसिद्ध ठिकाणी ही घटना घडली आहे.
तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. यामध्ये लहान मुलाचा देखील समावेश आहे.
यामध्ये 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती प्राथमिक माहिती मिळत आहे. आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
तात्काळ एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले, पर्यंटाकांना जमेल त्या पद्धतीने वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामधील काही पर्यटकांना बाहेर काढण्याचे काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.