Chhatrapati Sambhajinagar Chhatrapati Sambhajinagar
ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक!!, माणुसकीला काळीमा फासणारी घटना, Video Viral

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांवर अमानवी मारहाणीचा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • छत्रपती संभाजीनगरमधील निवासी विद्यालयात लहान मुलांना बेदम मारहाण

  • मारहाणीचा व्हिडिओ समोर...

  • मांडकीच्या निवासी निवासी विद्यालयातील प्रकार

(Chhatrapati Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांवर अमानवी मारहाणीचा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांवर अमानवी मारहाणीचा प्रकार २०१८ चा असून तब्बल 8 वर्षांनी उघडकीस आला आहे. शिपाई दीपक इंगळे याने एका लहान मुलाचे हात बांधून कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच केअरटेकर प्रदीप देहाडे यानेही विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. संतापजनक घटनेनंतर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तब्बल आठ वर्ष हे प्रकरण का दाबून ठेवले आणि बाहेर का आले यावरून मोठी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षकांनी आपली प्रतिक्रिया लोकशाही मराठीला दिली आहे, त्यावेळी ते म्हणाले की, दिव्यांग मुलांना तेथील केअरटेकर जे काळजीबाहक असतात. त्यांनी मुलांना मारहाण केली.त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळाने तिथे कारवाई केली. दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा