ताज्या बातम्या

ST Bank Sadavarte-Shinde Fight : मुंबई एसटी बँकेत तुफान राडा! गुणरत्न सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेमध्ये जोरदार हाणामारी

मुंबई एसटी बँकेत तुफान हाणामारी आहे, गुणरत्न सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा झाल्याचं पाहायला मिळाल आहे.

Published by : Prachi Nate

मुंबईतील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज गोंधळाचे भीषण रुप पाहायला मिळाले. गुणरत्न सदावर्ते गट आणि शिंदे गटाच्या (अडसूळ पॅनेल) कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे धक्काबुक्की, शिवीगाळ आणि फ्री-स्टाईल मारामारी झाली. या प्रकारामुळे बँकेच्या बैठकीला झाकोळून टाकणारा हाणामारीचा कलंक लागला आहे. आता हे प्रकरण थेट नागपाडा पोलिस ठाण्यात पोहोचले असून, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

बँक, ज्याची ओळख होती, आता वादांचा केंद्रबिंदू?

एसटी को-ऑपरेटिव्ह बँक ही एकेकाळी एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर उभारलेली, आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून प्रसिद्ध होती. मात्र सध्या या बँकेच्या व्यवस्थापनावर अनेक गंभीर आरोप होत असून, सतत वादग्रस्त घटनांनी तिची प्रतिमा डागाळली आहे.

आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दोन्ही पॅनेल सदावर्ते आणि अडसूळ गट पूर्ण उपस्थित होते. सदावर्ते गटाकडून काही संचालकांनी अडसूळ गटाविरोधात बँकेत होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर वातावरण चिघळले आणि वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.

साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, सदावर्ते गटाने बाहेरून लोकांना बोलवले आणि त्यांच्या मार्फत अडसूळ गटातील सदस्यांवर हल्ला करण्यात आला. या झटापटीदरम्यान काही सदस्यांचे कपडे फाटले, शिवीगाळ झाली, तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. महिलांवर अश्लील टिप्पणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

महिलांचा अपमान, मंगळसूत्र तोडण्याचा आरोप

अडसूळ गटातील एका महिला सदस्याने सांगितले की, विरोधी गटातील काही सदस्यांनी त्यांच्या महिला सहकाऱ्यांवर अश्लील शेरेबाजी केली, जातीवाचक वक्तव्ये केली, व एका महिलेचे मंगळसूत्रही तोडण्यात आले. या अपमानास्पद वर्तनामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि राडा झाला, असे त्या सदस्याचे म्हणणे आहे.

अडसूळ यांचा आरोप: "सदावर्ते गटाने भ्रष्टाचार केला"

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना गंभीर आरोप केले आहेत. "सदावर्ते गटाने बँकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. १२ कोटींच्या सॉफ्टवेअरसाठी ५२ कोटी रुपये मंजूर करून गैरव्यवहार केला गेला आहे. तसेच १२५ कर्मचाऱ्यांची भरती लाच घेतच झाली आहे," असे ते म्हणाले. या सगळ्या प्रकारांची माहिती आम्ही पोलिसांना दिली असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व काही स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी तक्रारी दाखल

या प्रकरणाचा पुढील तपास नागपाडा पोलिस करत असून, सध्या दोन्ही गटांशी संबंधित व्यक्तींकडून जबाब नोंदवले जात आहेत. पाच ते सहा सदस्य जखमी झाले असल्याची माहितीही समोर आली आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा एकेकाळचा गौरव आणि आजची वादग्रस्त स्थिती यामध्ये फार मोठा फरक पडला आहे. संचालकांच्या असंविधानिक वर्तनामुळे बँकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडे असून, खरे दोषी कोण हे पुढील तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र, कामगारांच्या पैशावर चालणाऱ्या या संस्थेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा