ताज्या बातम्या

राजस्थानमध्ये भीषण अपघात! लग्न सोहळा पार करुन परतणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकची धडक; 9 जणांचा मृत्यू

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला आहे. येथे एका अनियंत्रित ट्रॉलीने व्हॅनला धडक दिली.

Published by : Dhanshree Shintre

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला आहे. येथे एका अनियंत्रित ट्रॉलीने व्हॅनला धडक दिली. त्यामुळे व्हॅनमध्ये प्रवास करणाऱ्या 10 पैकी 9 जणांचा मृत्यू झाला. व्हॅनमधील लोक एका लग्न समारंभातून परतत होते. अकलेराजवळील पाचोळा गावात हा अपघात झाला. या व्हॅनमध्ये बागरी समाजातील 10 तरुण प्रवास करत होते, त्यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक एका कारमधून मध्य प्रदेशातून दुगरगाव येथून आपल्या घरी परतत होते. दरम्यान पाचोऱ्याजवळ एका अनियंत्रित ट्रकने या कारला धडक दिली. या अपघातामुळं झालावाड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अकलेरा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप बिश्नोई यांनी सांगितलं की, अकलेराजवळील डुंगर गावातील नागरिक शनिवारी मध्य प्रदेशात त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेले होते. दरम्यान, लग्नाच्या मिरवणुकीतून निघाले असताना त्यांच्या कारला भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या पोलिसांनी मृतांचे मृतदेह अकलेरा येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात ठेवले आहेत.

अपघातात ठार झालेले नागरिक एकाच कुटुंबातील असल्याचं पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितलं. सध्या पोलीस अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसातील हा दुसरा मोठा अपघात आहे. याआधीही पाच जणांचा डंपरनं चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गंगाधर पोलीस ठाण्याच्या परिसरात उघडकीस आली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा