ताज्या बातम्या

Delhi Haryana : डॉक्टरच्या घरी ८ पिस्तूल, एक वॉकी-टॉकी सेट..., हरियाणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कारवाईत असं काही सापडलं की....

दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरीदाबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हरियाणातील फरिदाबाद येथे पोलिसांनी केलेल्या छापेमारीतून एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Published by : Prachi Nate

अनेकदा इतर देशातील घुसखोरांचा भारतात प्रवेश केल्याचा आणि नवी ओळख घेऊन दहशतवाद्यांसोबत संपर्क साधल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. अशातच हरियाणातील फरिदाबाद येथे पोलिसांनी केलेल्या छापेमारीतून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरीदाबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका डॉक्टरच्या घरातून ३६० किलो अमोनियम नायट्रेट म्हणजेच स्फोटक पदार्थ, एक असॉल्ट रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

फरिदाबादचे सीपी सतेंद्र कुमार यांनी पत्रकार परिषद घेत छाप्यादरम्यान नेमक काय जप्त करण्यात आले याची संपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, "हरियाणा पोलिस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये एक आरोपी डॉ. मुझम्मिल याच्या घरातून काल, 360 किलो ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यात आला. ते अमोनियम नायट्रेट असू शकते. त्याचसोबत अनंतनाग येथून एके-47 जप्त करण्यात आली आहे. आता त्याला अटक करण्यात आली आहे."

आरोपी डॉक्टर मुझम्मिलला त्याच्या भावाच्या खोलीत एकटाच राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या घरातून एक असॉल्ट रायफल, आठ मोठ्या सुटकेस, अमोनियम नायट्रेट असलेले चार लहान सुटकेस, एक वॉकी-टॉकी सेट आणि 360 किलो अमोनियम नायट्रेट, 20 टायमर तसेच आठ कागदपत्रे जप्त केले. पोलिसांनी 10 दिवसांपूर्वी डॉक्टर मुझम्मिलला अटक केली. त्याच्यावर UAPA कायद्याच्या कलम 13, 18, 21 आणि 39, कलम 351(2) (BN5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जम्मू आणि काश्मीर पोलिस दहशतवादी समर्थन नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे टाकत आहेत. यादरम्यान आतापर्यंत काश्मीरमध्ये 100 हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथील रहिवासी डॉ. आदिल अहमद यांना पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अटक केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा