ताज्या बातम्या

Pandharpur Accident : पंढरपूरवरून परतताना एसटीचा अपघात, अपघातात जवळपास 30 जण जखमी

आषाढी एकादशी झाल्यानंतर पंढरपूर सोहळा आटोपून प्रवाशी भाविक पंढरपूरवरून माघारी येत असताना एक दु:खद घटना घडली आहे.

Published by : Prachi Nate

काल 6 जुलैला राज्यभरात आषाढी एकादशी साजरा करण्यात आली. तर अनेक वारकरी गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरच्या दिशेने वारी करत होते. काल आषाढी एकादशी झाल्यानंतर भाविक पंढरपूरवरून माघारी येत असताना एक दु:खद घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीजवळ महाबीज कार्यालयासमोर एस टी बस दुभाजकावर आढळून पलटी होऊन बसचा अपघात झाला आहे.

हा अपघात आज रात्री 3 वाजताच्या सुमारास झाला आहे. या अपघातात जवळपास 30 प्रवाशी भाविक जखमी झाले आहेत. तर जखमी भविकांवर चिखली आणि बुलढाणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस पंढरपूर वरून खामगाव जात होती त्यावेळेस हा अपघात झाला आहे.

या बसमध्ये 51 भाविक प्रवास करत होते. पंढरपूर सोहळा आटोपून भाविक घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी भाविकांना तत्काळ मदत केली आहे. जखमी भाविकांना चिखली व बुलढाणा सामान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wardha Crime : शिक्षणासाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय तरुणीची नैराश्यातून आत्महत्या

Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन

Jitendra Awhad On Ashish Shelar : आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले, "मराठी माणसाची तुलना पहलगामच्या घटनेशी.."

Shivsena : "राज ठाकरेंच्या विरोधात नाही, पण उद्धव ठाकरे..." शिंदेंच्या शिवसेनेकडून विजयी मेळाव्यावर मोठ वक्तव्य