कोल्हापुरमध्ये 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चौकशीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या महिलेच्या मृत्यूचं कारण समजणार आहे.
संभाजीनगरमधील जुनी मोरे कॉलनी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रचना चौगले असं या महिलेचं नाव आहे. आठवडाभरापूर्वीच मोठ्या थाटामाटात बारशाचा कार्यक्रम पार पाडला होता. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे नामकरण पियुषा असं ठेवण्यात आलय. या हृदयस्पर्शी घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.