ताज्या बातम्या

Air India flight crashed : उडी मारली आणि जीव वाचला! लेकचा जीव वाचल्यानंतर आईने व्यक्त केल्या भावना, म्हणाली, "माझ्या मुलाने..."

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळून भीषण अपघात झाला. यावेळी एका महिलेने तिच्या मुलाबाबत एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे.

Published by : Prachi Nate

आज 12 जून रोजी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी एअर इंडियाच्या Dreamliner 789 या विमानाने उड्डाण घेतलं आणि टेकऑफनंतर अवघ्या 10 मिनिटातच अहमदाबाद येथील मेघानीनगर येथे विमानाचा भीषण अपघात झाला आहे. अहमदाबाद एयरपोर्टच्या रनवे 23 वरून टेकऑफ करत होते. टेकऑफनंतर लगेचच विमानाने ATC ला ‘मेडे’ कॉल केला. मात्र यानंतर विमानाचा संपर्क तुटला. यानंतर ही दुर्घटना घडली. या अपघातात विमानामध्ये 12 क्रु मेंबर्स तर 242 प्रवासी होते. यात आतापर्यंत 204 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती आहे.

या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील होते, त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत या विमानात 230 प्रवासी,12 क्रू मेंबर्सचा समावेश होता. यावेळी विमानात 169 भारतीय,52 ब्रिटीश प्रवासी होते, तर 7 पोर्तुगीज आणि एका कॅनडियन प्रवाशाचाही समावेश होता. हा विमान अपघात विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळला. यावेळी रमीला बेन नावाच्या एका महिलेने तिच्या मुलाबाबत एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे.

तिचा मुलगा देखील दुपारचं जेवण करण्यासाठी घटना झालेल्या वस्तिगृहात गेला होता. यावेळी विमान वस्तिगृहावर कोसळताच तिच्या मुलाने तत्काळ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे तो सुरक्षित असल्याचं त्या महिलेने सांगितलं आहे. दरम्यान रमीला बेन यांनी म्हटलं आहे की, "ज्यावेळेस विमान वसतिगृहावर कोसळले त्यावेळेस माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, ज्यामुळे त्याला थोडी दुखापत झाली आहे. त्याच्यासोबत माझे बोलणे झाले आहे".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात