ताज्या बातम्या

मी मेल्यानंतर सर्व काही ठीक होईल असे स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

तरुण वयातील युवकांच्या जीवन संपवण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

तरुण वयातील युवकांच्या जीवन संपवण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. मी मेल्यानंतर सर्व काही ठीक होईल असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून ओमकार नारायण डांगरे या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बिडकीन परिसरातील हा तरुण औरंगाबाद येथील महाविद्यालयात बीकॉमच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता.

ओमकार डांगरे हा पोलीस व सैनिकी भरती तसंच शासकीय नोकरीची तयारी करत होता अशी माहिती त्याच्या मित्राकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर क्रमांक १८ मध्ये धाव घेत विहिरीजवळ ओमकार याची गाडी आणि चप्पल दिसून आली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी १ तासाचे अथक परिश्रम घेत मृतदेह विहिरीच्या बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी ओमकार डांगरे याने त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटस वर "I just feel like if I died everything will be ok:) " अशा प्रकारे स्टेटस ठेवत त्याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा