ताज्या बातम्या

संभाजीनगरमध्ये रोमिओंच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबाला आरोपीच्या भावांकडून धमक्या

तरुणाच्या जाचाला कंटाळून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी संभाजीनगरच्या ओव्हर गावात घडली.

Published by : Dhanshree Shintre

तरुणाच्या जाचाला कंटाळून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी संभाजीनगरच्या ओव्हर गावात घडली. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांनी मुलीच्या घरासमोर जाऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला होता.

पूजा शिवराज पवार असे मृत तरुणीचे नाव आहे. 'तू माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझ्या भावाला जिवे मारून टाकीन अशी धमकी हा तरुण सतत पूजाला देत होता. आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल' असे म्हणत चाकू, तलवार दाखवून धमकी दिल्याचा आरोप आत्महत्या करणाऱ्या पूजाच्या कुटुंबियांनी केला आहे. आरोपीच्या चुलत भावाला देखील अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतो आहे.

धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि आरोपीला अटक केल्यानंतर देखील त्याच्या कुटुंबीयांकडून पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान या दोघांवर दहशत निर्माण करणे आणि धमकावल्याप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सुनील तटकरे यांची आज पत्रकार परिषद; महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

Onion : आता 24 रुपये किलोने मिळणार कांदा! केंद्र सरकारची सवलत योजना, नेमकी काय आहे 'ही' योजना

BMC Election : मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 410 हरकती आणि सूचना

Ganpati Visarjan 2025 : बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज