ताज्या बातम्या

Pune Crime : भूतानच्या महिलेवर पुण्यात अत्याचार; वकिलासह सहा जण अटकेत

या प्रकरणी पोलिसांनी वकिलांसह सहा जणांना अटक केली असून मंगळवार, 8 एप्रिल रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

Published by : Rashmi Mane

पुण्यात स्वारगेट एसडी डेपोत झालेल्या महिलेवरील अत्याचाराच्या घटेननंतर आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात भूतान येथून आलेल्या एका परदेशी तरुणीवर सात जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी कार्यकर्ता शंतनु कुकडे याला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक केल्यानंतर पोलीस तपासात कुकडे याने त्याच्या अन्य साथीदारांसह हे क्रूकृत्य केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी वकिलांसह सहा जणांना अटक केली असून मंगळवार, 8 एप्रिल रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

अटक केलेल्यांची नावे -

ऋषिकेश नवले (वय 48), प्रतीक शिंदे (वय 36), विपीन बीडकर (वय 48), सागर रासगे (वय 35), अविनाश सूर्यवंशी (वय 58) आणि मुद्दसीर मेमन (वय 38).

सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव म्हणाल्या की, "पीडित महिला भूतान देशाच्या नागरिक असून, त्या नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या होत्या. त्या निराधार असून त्यांच्या असहाय्यतेचा आरोपींनी गैरफायदा घेऊन जबरदस्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. पीडितेने आरोपींच्या नावानिशी तक्रार दिली. आरोपी हे एकमेकांचे मित्र असून, त्यांना गुन्हा करण्यास कुणी प्रवृत्त केले, तसेच दाखल गुन्ह्यात त्यांचे इतर कुणी साथीदार आहेत का, याचा तपास करायचा आहे." दरम्यान, न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?