स्वारगेटमधील घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा अश्लील चाळे करत विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुणे ते सांगली असा शिवशाही बस मधून प्रवास करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीचा बसमधील प्रवास करणाऱ्या तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
सांगलीकडे येत असताना त्याने खिडकीजवळून, मागील सीटवरून वारंवार स्पर्श करुन अश्लील चाळे केल्याची माहिती मिळत आहे. सांगली बस स्थानकात बस थांबल्यानंतर पीडितेनं सदर प्रकार चालक आणि वाहकाला सांगितला. त्या तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.