ताज्या बातम्या

Aadhaar : आधारचं विदआऊट इंटरनेट अन् पेपरलेस व्हेरिफिकेशन करता येणार; सरकारचा भन्नाट प्लॅन वाचलात का?

लवकरच आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून एक नव आधार ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात येणार आहे.

Published by : Varsha Bhasmare

लवकरच आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून एक नव आधार ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात येणार आहे. जे विना इंटरनेट कनेक्शन पूर्णपणे सुरक्षित आणि पेपरलेस ओळख व्हेरिफिकेशन सुविधा देणार आहे. ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या खाजगी माहितीवर पूर्ण नियंत्रण राहील आणि डेटा लीक किंवा डेटाच्या गैरवापर करण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.

युजर्सला फक्त आवश्यक डिटेल्स शेअर करता येणार…

युआयडीएआय यांनी याबाबत माहिती दिली की, हे नवीन ॲप्लिकेशन आधार व्हेरिफिकेशनच्या सुविधेसह असेल. यामध्ये युजर त्यांच्या इच्छेनुसार आधारची आवश्यक तेवढीच माहिती शेअर करू शकणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कराव्या लागणाऱ्या फेस वेरिफिकेशनसाठी इंटरनेटची आवश्यकता नसेल

दैनंदिन कामांसाठी वापर करता येणार…

युआयडीएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार या ॲपचा वापर हॉटेलमध्ये चेक इन करणे, रेसिडेन्शियल सोसायटीजमध्ये प्रवेश मिळवणे, इव्हेंटमध्ये प्रवेश मिळवणे, तसेच इतर अनेक जागांवर व्हर्चुअल आधार कार्ड दाखवून सोप्या पद्धतीने करता येणार आहे. यासाठी क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे.

या ॲपची खासियत काय?

– निवडक माहिती शेअर करण्याची सुविधा पूर्ण आधार कार्ड शेअर करायचं की केवळ फक्त नाव फोटो पत्ता इत्यादी निवडक माहिती हा निर्णय युजर्सचा असेल.

– पूर्णपणे ऑफलाइन वापर शहरापासून किंवा गावांपासून दूर असलेल्या भागात ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही. अशा ठिकाणी देखील हे ॲप चालेल कारण या ॲप साठी इंटरनेटची आवश्यकता नाही.

– बायो सिक्युरिटी लॉक एका क्लिकमध्ये बायोमेट्रिकने तुम्ही हे ॲप लॉक आणि अनलॉक करू शकता

– कुटुंबातील पाच सदस्यांचा आधार डिटेल्स यामध्ये ठेवता येतात. सोप्या पद्धतीने अपडेट मोबाईल नंबर आणि पत्ता बदलणे आणखी सोपे होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा