आधार कार्ड आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. कोणत्याही कामासाठी आधारकार्डची गरज भासते. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत आधार कार्ड बनवले गेले आहे. तुमच्या आधार कार्डला व्हॅलिडिटी असते का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विशिष्ट परिस्थितीसाठी आधार कार्डला व्हॅलिडिटी आहे. लहान मुलांचे आधार दोन वेळा अपडेट करावे लागतात. परंतू अपडेट केले नाही, तर आधार अमान्य होते, असे नाही.
लहान मुलांचे आधार कार्ड दोन वेळा अपडेट करणे गरजेचे आहे. एकदा पाच वर्षाच्या मुदतीत आधारकार्ड अपडेट केले जाते. त्यावेळी आधारकार्ड धाराकांचे फिंगर प्रिंट्स, डोळ्यांचे बुबुळ आणि फोटो अपडेट केले जाते. दुसऱ्यांदा मुलांचे आधार कार्ड त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षानंतर अपडेट सरकारने मोफत ठेवले आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.