ताज्या बातम्या

Aadhar card : तुमचे आधारकार्ड या गोष्टींशी लिंक आहे का? नसेल तर होतील 'या' समस्या

आधारकार्ड लिंक: तुमचे आधारकार्ड फोन नंबर, पॅनकार्ड आणि बॅंक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

Published by : Team Lokshahi

आजच्या काळात, मुलांच्या शाळांच्या प्रवेशापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेईपर्यंतच्या सर्व कामांसाठी आधारकार्डची (Aadhar card) आवश्यकता असते. सरकारी रेशन घेणे किंवा कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करणे, अशी सगळी कामे आधार कार्डशिवाय करणे शक्य नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? आधाराकार्ड कोणत्या गोष्टींशी लिंक केले पाहिजे? जेणेकडून भविष्यात तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

'या' तीन गोष्टी आधारकार्डसोबत लिंक करा

अनेकवेळा, आधार अपडेट न केल्यास, मोबाईल नंबर लिंक न केल्यास बॅंक खात्यासंबंधीत साधी कामे होऊ शकत नाही. जर तुमचे आधारकार्ड फोन नंबर, पॅनकार्ड (PanCard) आणि बॅंक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

मोबाईल नंबर अपडेट नाही केला तर 'या' समस्यांना सामोरे जावे लागणार

जेव्हा तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करता त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला आधारकार्डवर जोडलेल्या फोन नबंरवर पडताळणीसाठी एक ओटीपी येतो. जर तुमचा आधार फोनशी लिंक नसेल तर बॅंकेत केवायसी करण्यात अडचणी येऊ शकते.

पॅनकार्ड लिंक केल्यास व्यवहारांमध्ये 'या' समस्या होऊ शकतात

पॅनकार्ड हा आयकर विभागाकडून जारी केलेला 10 अल्फान्यूमेरिक कोड आहे. पॅनकार्ड आधारशी लिंक केलेले नसेल, तर तुम्हाला बॅंक खाते उघडण्यात, कर्ज घेण्यात त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड (credit card) - डेबिट कार्ड (Debit Card) मिळविण्यात अडचणी येऊ शकतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार

Pune Metro : पुणेकरांना मिळणार 2 नवीन मेट्रो स्थानके,सरकारकडून 683 कोटींची मंजुरी

Ashish Kapoor : टीव्ही अभिनेता आशिष कपूरला अत्याचाराच्या आरोपाखाली पुण्यातून अटक

Ganeshotsav : Amravati : अमरावतीत 75 किलो ड्रायफ्रूटपासून साकारली बाप्पाची अनोखी मूर्ती