Aditya Thackeray  Team Lokshahi
ताज्या बातम्या

… तर मी राजीनामा द्यायला तयार; आदित्य ठाकरे असे का म्हणाले?

आदित्य ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आदित्य ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते आहे. दोघेही एकमेकांवर टीका करताना आपल्याया पाहायला मिळत आहे.

मुंबई फुटबॉल असोसिएशन, फुटबॉल ऑस्ट्रेलिया आणि मुंबईतील ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासद्वारे आजपासून पुढील दोन दिवस फुटबॉल डेव्हलपमेंट वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं आहे.

या फुटबॉल वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारविरोधात जनमत आहे असं वाटतंय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. तिथे निवडणूक घेऊ. ठरवू काय होतं ते असे मुनगंटीवार म्हणाले होते. यावर उत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारलं असून मी राजीनामा देतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्यासमोर उभं करा. असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा