केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला देशाचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत - १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026 कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत असून, महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला या बजेटमधून मोठ्या सवलतींची अपेक्षा आहे.सामान्य माणसापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पावर खिळल्या आहेत. सरकार आगामी एका वर्षात काय करणार आहे, याचा अंदाज बजेटवरून येतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी आणि पुढचा टप्पा ९ मार्च २ एप्रिल पर्यत असा असणार आहे. या अधिवेशनादरम्यान 30 बैठका होतील...
महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण ठरलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक आणि आशयपूर्ण ट्विट करत त्यांच्या निर्णयाचं उघडपणे कौतुक केलं आहे. कठीण प्रसंगात घेतलेला सुनेत्रा पवार यांचा निर्णय हा धाडसी असून, महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “प्रसंग कठीण होता… पण ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.” या शब्दांतून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या राजकीय धैर्याचं आणि संयमाचं कौतुक केलं.
सुनेत्रा पवार यांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच्या आधी विधानभवनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली. सुनेत्रा पवार राज्याच्या 11 व्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या असून राष्ट्रवादी पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार स्वतः सांभाळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी शनिवारी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. याच पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
केदारनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनेक भाविक केदारनाथला दर्शनासाठी येत असतात. यावेळी फोटो, व्हिडिओ, रिल्स काढले जातात.याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे रांगेत राहून जे दर्शन घेतले जाते त्याला उशिर होतो. याच पार्श्वभूमीवर आता केदारनाथ मंदिरात भाविकांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली असून मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्व राजकीय पक्षांकडून तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून तयारी करण्यात येत आहे. आमदार अमित देशमुख आज रेणापूर मतदारसंघात असणार असून सकाळी 11 वाजता जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेत अमित देशमुख काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आज सर्व मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाउन जलद/सेमी-जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सकाळी 10:28 ते दुपारी 3:40 पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद/सेमी-जलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या येणार आहेत.
राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत असून, नागरिकांना थंडी, उकाडा, ढगाळ वातावरण आणि वायू प्रदूषण अशा सर्वच परिस्थितींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, थंडीने जवळपास निरोप घेतल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे. कधी सकाळी गारवा तर दुपारी उकाडा, तर कधी अचानक ढगाळ वातावरण अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात १ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर थंडी जवळपास गायब झाली. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. जानेवारी महिन्याच्या अखेरीसच तापमान वाढू लागले असून, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात अस्थिरता वाढली आहे.
राष्ट्रपती भवनात अर्थमंत्री निर्मला सीतारामण दाखल झाल्या आहेत. निर्मला सीतारामण आणि राष्ट्रपती यांच्यात चर्चा सुरू आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनातून निर्मला सीतारामण संसदेकडे रवाना होतील.
राष्ट्रपती भवनात अर्थमंत्री निर्मला सीतारामण दाखल झाल्या आहेत. निर्मला सीतारामण आणि राष्ट्रपती यांच्यात चर्चा सुरू आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनातून निर्मला सीतारामण संसदेकडे रवाना होतील.
संसदेत मंत्रिमंडळ बैठक सुरू झाली आहे. काही वेळात निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून देशाचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. यावेळी देशाची उत्पादन क्षमता वाढली असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, भारताला औषध निर्मितीचे केंद्र बनवत आहोत.
वाराणसी आणि पटनामध्ये जहाज केंद्र उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे
पर्यटन वाढीसाठी सी- प्लेन सुरू करणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.
पुढील 5 वर्षात 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग तयार करणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
निर्मला सीतारामण यांनी पुणे, मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा केली आहे.
देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब स्थापन करणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
खासगी आणि सरकारी क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर तयार करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष वसतीगृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
केरळ, तामिळनाडू, आध प्रदेशमध्ये दुर्मिळ खनिज उत्खनन सुरू करण्यात येणार आहे.
खेलो इंडिया मिशन सुरू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI टूल तयार करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मत्स्यउद्योगाला प्रोत्साहन देणार असल्याचे म्हटले असून मत्स्यपालनासाठी 500 अमृत जलाशय तयार करणार असल्याची माहिती मिळत आहे.
दिव्यांगांना अधिक सक्षम करण्यासाठी नवी योजना आणण्यात येणार असून दिव्यांग सहारा योजनेची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली असून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी खरेदी केंद्रे उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
इन्कम टॅक्सची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून सुरु होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
अपघात विमा करमुक्त असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
आयकर परतावा भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
रांची आणि तेजपूरमध्ये नॅशनल मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट तयार करण्यात येणार आहे.
मंदिरांसाठी 5 हजार कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
करचोरी प्रकरणात शिक्षा नाही तर दंड ठोठावण्यात येणार असल्याची मोठी घोषणा सीतारमण यांनी केली आहे.
क्लाऊड सर्विसेस देणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत करमुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्यांना आर्थिक सूट देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
कॅन्सरची औषधं
मधुमेहाची औषधं
सौर पॅनेल
सीएनजी
भारतात बनवलेले कपडे
ईव्ही वाहने
मोटारसायकल
फ्रोझन मासे
ईव्ही लिथियम बॅटरी
वैद्यकीय उपकरणे
एलसीडी
एलईडी
कपडे
क्रीडा साहित्य
मोबाईल फोन
बॅटरी
वैद्यकीय उपकरणे
लिथियम आयन बॅटरी
अपघात विमा
खनिज
दारु
शूज
पीव्हीसी फ्लेक्स शीट्स
आज केंद्र सरकारचे अर्थसंकल्प बजेट जाहीर झाल आहे,अर्थसंकल्पाबाबत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया आहेत पिएम किसान योजनेत वाढ नाही शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही,दुष्काळ पाणीटंचाई पिक विमा यावर एकही ठोस घोषणा नाही शेतकऱ्याना बळकटी देणाऱ्या तरतुदी नसल्याची टीका हिंगोलीत शेतकऱ्यांनी केली असून बजेट जाहीर झाल्यानंतर शेतकरी समाधानी आहे का
महाराष्ट्राला पाच ते सहा हजार कोटी रुपये देऊन तोंडाला पाणी पुसण्याचे काम केंद्र सरकारने केलं..
सर्वाधिक कर महाराष्ट्र देतो मात्र न्याय दिला नाही
महाराष्ट्र या बजेटमध्ये पिछाडीवर आहे सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होते.. पण महाराष्ट्राला काही दिलं नाही
आरएसचा मुख्यालय महाराष्ट्रात आहे मात्र केंद्राच महाराष्ट्रावर लक्ष नाही
नेत्यांचा प्रभाव बीजेपी सरकार मध्ये संपुष्टात आला आहे..
शेतकरी शेतमजूरांना न्याय मिळाला नाही
शहरी करणारला जास्त निधी पण ग्रामीण भागाला निधी नाही..शिक्षण आरोग्य याला निधी नाही
आज केंद्र सरकारचे अर्थसंकल्प बजेट जाहीर झाल आहे,अर्थसंकल्पाबाबत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया आहेत पिएम किसान योजनेत वाढ नाही शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही,दुष्काळ पाणीटंचाई पिक विमा यावर एकही ठोस घोषणा नाही शेतकऱ्याना बळकटी देणाऱ्या तरतुदी नसल्याची टीका हिंगोलीत शेतकऱ्यांनी केली असून बजेट जाहीर झाल्यानंतर शेतकरी समाधानी आहे का
विक्रोळी पार्क साइट परिसरात माऊली ज्वेलर्स या मराठी दुकानदाराला परप्रांतीय नागरिकांकडून त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित घटनेबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
मध्य रात्री रस्त्यावर उतरले सर्व नगरसेवक कार्यकर्ता सहित
अवैध दारू, गुटखा व अमली पदार्थ विक्रीवर आमदारांचा संजय उपाध्याय सिंघम स्टाईल ने कारवाई
मध्यरात्री रस्त्यावर उतरून झडती, पोलिसांवर सवाल
पोलीस नाक्याखाली गैरव्यवहार सुरूच कसा? – आमदार संजय उपाध्याय
आमदार संजय उपाध्ये यांनी दारू विकणाऱ्या गुटखा विकणाऱ्याला रस्त्यावर सिंघम स्टाईल ने दिला चोप