फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सी लिंकवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पुण्यातील महापौर मंजूषा नागपुरेंनी प्रकल्पांचा आढावा घेतला. शिवाजीनगर -घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक असणार असून यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मंत्री नरहरी झिरवाळ आज पत्रकार परिषद घेणार असून राजेंद्र ढेरंगेच्या लाच प्रकरणात झिरवाळ मोठी माहिती समोर आणणार असल्याची माहिती
उल्हासनगर पालिकेत कामगार संघटना आक्रमक झाले आहेत. प्रथम, द्वितीय, आणि तृतीय श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघटना मैदानात उतरले आहेत.
मुलुंड मेट्रो अपघात प्रकरणात MMRDAकडून सल्लागार कंपनीची हकालपट्टी करण्यात आली असून यासह आणखी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
सुधीर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून चंद्रपुरातील सत्तानाट्यानंतर मुनगंटीवारांनी त्यांची भेट घेतली आहे.
ठाण्यात जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला असून या घटनेत एकाच कुटुंबातील 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेतून आमदार तानाजी सावंतांवर गंभीर आरोप
'तानाजी सावंतांनी पक्षाच्या विरोधात विरोधकांना रसद पुरवली'
अनंत लंगडेंकडून तानाजी सावंतांवर हल्लाबोल
ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या साकेत पुलाच काम पूर्ण झाल्यामुळे आज पासून 200 मीटरचा मार्ग सुरू झाला आहे.
त्यामुळे तात्पुरता दिलासा वाहन धारकांना मिळाला आहे. येत्या मे महिन्याच्या अखेर इतर देखील काम पूर्ण होणार आहेत…
यामुळे ठाणे मुंबई … ठाणे भिवंडी वाहतूक कोंडी ब-याच अंशी कमी होणार आहे…
- अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
- गंगापूर कडून अशोक स्तंभाकडे जाणाऱ्या दुचाकी वरील समाधान देवरे याचा अपघातात मृत्यू
- भरधाव वेगात जात असताना दुभाजकाला धडकल्याने दुचाकी चालकांचा अपघात
- अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची माहिती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा पुतळा जाळण्याच्या आधीच पोलिसांनी घेतला ताब्यात.
सोलापुरातील पूनम गेट येथे हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध
सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नोंदवले निदर्शने..
हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतःची मिशीम काढून जाहीर माफी मागितली पाहिजे..
अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या १८ फेब्रुवारीच्या पहली महासभेत ठहराव क्रमांक १६ ‘टिपू सुलतान चौक’ हे नाव रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, २०१६ साली याच चौकाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा ठराव भाजपनेच मंजूर केला होता.
३ डिसेंबर २०१६ रोजीच्या महासभेत ठराव क्रमांक २७ अंतर्गत लोधा कॉम्प्लेक्स मार्गावरील चौकाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक नरेंद्र मेहता यांनी मांडला होता.
तो प्रस्ताव भाजपच्या बहुमताने मंजूर झाला होता.
आज सकाळी सातारा लोणंद मार्गावरील सालपे घाटात ट्रकला भीषण आग लागल्याने तब्बल एक तास वाहतूक कोंडी बघायला मिळाली.
दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी केसीपीएल कंपनीचा ट्रक या दुर्घटनेत जळून खाक झाला आहे.
आज सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती मिळतात वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे कर्मचारी व शरयू साखर कारखान्याचा अग्निशामक बंब दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रमाची सुरूवात आजपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा जागतिक हवामान संवाद मुंबईतील जिओ कन्व्हेशन सेंटर येथे होणार आहे.
शहराला ग्लोबल साऊथमधील नागरिक-आधारित हवामान मंचाचे केंद्रस्थान देणारा हा उपक्रम पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेने आयोजित केला आहे.
भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेले पुतणे धनंजय सावंत भाजपसोबत कायम राहणार
तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांची भेट
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट
भेटीचा फोटो समोर , धनंजय सावंत यांच्यासह चारही अपक्ष उमेदवार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती
तानाजी सावंताना शह देण्यासाठी धनंजय सावंत यांना जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष भाजप देणार देणार असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती
आगीचे लोट उसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण
अग्निशामन दलाला आग विझवण्यात यश
सपकाळ आणि टिपूच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन
संग्राम जगतापांच्या नेतृत्वात पुतळ्याचं दहन
एफआरपीनुसार मोबदला मिळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
साखर कारखानदारांकडून घेतली जाणार 10 कोटींची बँक गॅरंटी
कारखानदारांनी ऊस उत्पादकांची रक्कम थकवल्यास बँक गॅरंटी मधून दिली जाणार रक्कम
नवी मुंबई शहरामध्ये शिंदे गटाचे शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी नवी मुंबई शहरांमध्ये अनधिकृत पणे बॅनरबाजी करण्यात आली होती
कोणत्याही प्रकारे परवानगी महानगरपालिकेकडून घेतली गेली नव्हती
त्यामुळे एक नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने नवी मुंबई शहरातले अनाधिकृतपणे शिवसेनेचे बॅनर हटवलेले आहेत
बॅनर मधून गणेश नाईक यांचा समाचार घेण्यात आला होता हे बॅनर अनाधिकृत असल्यामुळे महानगरपालिकेने कारवाई करण्यात आली आहे..,
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सोबत करणार चर्चा
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर होणार चर्चा
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदांच्या वाटपावर होणार चर्चा
भाजपच्या कार्यालयाजवळ मास मूवमेंट संघटनेची घोषणाबाजी
अचानक केलेल्या घोषणाबाजीमुळ गोंधळ
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन दिले सोडून
टिपू सुलतान चा फोटो घेऊन भाजप कार्यालय जवळ घोषणाबाजी
तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही दिल्या घोषणा
ब गटातून श्रीलंका आणि झिम्बाब्वे सुपर ८ फेरीत दाखल
आर्यलंड - झिम्बाब्वे सामना पावसामुळं रद्द त्यामुळं टी 20 वर्ल्डकपमधून ऑस्टेलिया बाहेर
टी 20 वर्ल्डकपमध्ये कांगारुंचे आव्हान संपुष्टात
एपस्टीनच्या काळ्या फाईल्स मध्ये मोदींचे नाव हे देशासाठी लज्जास्पद..
NSUI च्या वतीने मोदींच्या राजीनाम्याची मागणी.
आसाम - कोकराझार जिल्ह्यातील गोसाईगाव परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७ वर एका तेल टँकरला भीषण आग लागली होती
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
या आगीमुळं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७ वर वाहतूक कोंडी झाली होती
सुधार, स्थायी, बेस्ट आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याचा दिवस आहे
स्थायी आणि शिक्षण समितीसाठी भाजपा अर्ज दाखल करणार , तर बेस्ट साठी शिवसेना अर्ज भरणार
मात्र अद्याप सुधार समितीचा तिढा सुटला नसल्याची माहिती
कॅम्प तीन च्या थायरा सिंग दरबारजवळील शिल्पा अपार्टमेंट परिसरात ही घटना घडली,
तिघे तरुण दुचाकीवरून परिसरात आले,
त्यांनी पार्क केलेल्या एका कारवर मोठा दगड फेकून कारच्या पुढची काच फोडली,त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले,
दरम्यान या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले
,घटनेचा गुन्हा मध्यवर्तीय पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत...
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज रायगड जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली.
वारंवार पाठपुरावा करून देखील जिल्हा परिषद मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी न देणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंचांवर कारवाई करावी,
सेवानिवृत्तीनंतर कोणताही लाभ दिला जात नाही,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या हस्ते कर्नाटकातील हेलिकॉप्टर असेंबली लाईनचे उद्घाटन
टाटा ॲडव्हान्स सिस्टिम यांच्याकडून एअरबस एच१२५ हेलिकॉप्टरच्या फायनल असेंबली लाईनची कर्नाटकात उभारणी
हे हेलिकॉप्टर प्रामुख्याने प्रवासी वाहतूक, व्हीआयपी ट्रान्सपोर्ट, पोलिसिंग, एअर अॅम्ब्युलन्स आणि उच्च उंचीवरील ऑपरेशन्ससाठी वापरले जाते
सर्वात शक्तिशाली सिंगल इंजिन असलेलं एच१२५ हेलिकॉप्टरची भारतात निर्मिती केली जाणार
अमेरिकेतील रोड आयलंड राज्यातील पावटकेट शहरात एका आईस हॉकी स्पर्धेदरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.
डेनिस एम. लिंच अरेना येथे झालेल्या या हिंसाचारात संशयित हल्लेखोरासह तिघांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या वेळी हा गोळीबार झाला, तेव्हा अरेनामध्ये हॉकी स्पर्धेसाठी विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी होती.
घटनेची माहिती मिळताच पावटकेट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
आज बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून जगभारतील १३ देशांना आमंत्रित करण्यात आले आहे.
अलीकडेच पार पडलेल्या १३ व्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीचा (BNP) प्रचंड बहुमतांनी विजय झाला आहे.
शेख हसीनाच्या पतनानंतर देशात दीड वर्षांनंतर लोकशाही मार्गाने नव्या सरकारची स्थापना होत आहे.
शिवाजीनगर हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
मुख्य आरोपी नदीमचा साथीदार रिझवान अन्सारी उर्फ ‘रिझवान DJ’ अटक
आरोपीकडून सुमारे 40 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त
शिवाजी नगर पोलिसांची सापळा रचून कारवाई
या आधी शिफाच्या हत्याप्रकरणात झाली होती रिझवानची चौकशी
वाडेश्वर हॉटेलच्या समोर तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी
एकमेकांना धक्का लागल्याने तरुणांनी घातला राडा
संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
दोन दिवसांपूर्वीची घटना
चेक बाउन्स प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
न्यायालयाने राजपालच्या शिक्षेला १८ मार्चपर्यंत स्थगिती दिली असून, त्याची कारागृहातून तात्पुरती सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
राजपालने तक्रारदार कंपनीच्या खात्यात १.५ कोटी रुपये जमा केल्याची नोंद न्यायालयाने घेतली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1 लाख 23 हजार किमतीचा 6.17 मिली मेफेड्रॉन म्हणजेच MD हा अमली पदार्थसह एकूण 2 लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यामध्ये मंगेश पवार या आरोपीला अटक करण्यात आली आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार जामखेड कर्जत मार्गांवर पवारहा अमली पदार्थ विक्री करिता येणार आहे.
मध्यप्रदेश–महाराष्ट्र जोडणाऱ्या बिजासन घाट येथे रस्त्यावर काम सुरू असताना भीषण अपघात झाला.
हायवे कंपनीच्या कामादरम्यान एका भरधाव ट्रकने इंजिनीयरला ज्ञधडक दिल्याने इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला.
सांगोला - कोल्हापूर महामार्गावर सीएनजी कारणे घेतला पेट.....
सांगोला सूतगिरणी समोरची घटना....
कार मधील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला....
महामार्गावर कार पेटल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी बंद....
आगीत कार जळून खाक..
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या "पॅालिटिकल अफेअर्स कमिटीची" बैठक..
उद्या सकाळी ११ वाजता टिळक भवन दादर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे..
मुंबईमध्ये नुकत्याच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांची भारत दौऱ्याच्या भाग म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक वर स्वागतात अशी खास तयारी केली गेली आहे.
त्यांच्या मुंबई आगमनानिमित्त वांद्रे-वरळी सी लिंकवर मोदी-मॅक्रॉन यांचे फोटो आणि प्रकाश सजावट करण्यात आली आहे, जे त्यांच्या भेटी आणि चर्चांसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात.
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव ९ कोटी चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात होता. अखेर कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे.
आज राजपालची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच राजपालने मीडियाशी संवाद साधत या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
सोयगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात अवघ्या ४ महिन्यांत तब्बल ३ हजार ४४८ बोगस जन्मनोंदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामपंचायतीच्या पोर्टलचा पासवर्ड चक्क बिहारमधून हॅक करून हा संपूर्ण कारभार करण्यात आला.
गावची लोकसंख्या साडेचार हजार आणि जन्मनोंदी साडेतीन हजार झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
निवडणुकीतील पैसे वाटपावरुन भास्कर जाधवांचं टीकास्त्र
निवडणुकीत पैशांचा प्रचंड पाऊस पडेल याची कल्पना होती
कार्यकर्ते विकले जात असल्याचे दुःख आहे- भास्कर जाधव
काही पदाधिकारी निवडणुकीपूर्वीच विकले गेले, मग स्वतःला शिवसैनिक कसे म्हणायचे?
पक्षप्रमुखांनी परखड भूमिका घेण्याची वेळ आली आहे- भास्कर जाधव
50 खोके-100 खोके आम्हालाही मिळू शकले असते, पण आम्ही तत्त्वांशी तडजोड केली नाही.
रुपाली चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांचं कौतुक
'सुनेत्रा वहिनी भावनांच्या पलीकडे जाऊन कर्तव्य पार पाडतायत'
'दादा गेल्यावर वहिनींनी चौथ्या दिवशी जबाबदारी पेलली'
विलीनीकरणाच्या चर्चांचे कोणतेही पुरावे नाहीत- चाकणकर
पुराव्याशिवाय अशा पद्धतीचे विधानं करणं चुकीचं - चाकणकर
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सोमवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ११ सुरक्षा कर्मचारी आणि एका मुलाचा मृत्यू झाला.
सुरक्षा दलांनी सैनिकांच्या निवासी परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न रोखल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन लष्कराच्या चौकीवर धडकवले.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
राष्ट्रवादीचे 12 आमदार शरद पवारांच्या संपर्कात- सूत्र
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासोबत संपर्कात- सूत्र
लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या अशी 12 आमदारांची इच्छा- सूत्र
शरद पवार यांच्या बड्या नेत्याकडून आमदाराना शरद पवारांचं वय आजारपण आणि साहेबांची इच्छा म्हणून भावनिक साद
तसेच काल मुंबईत झालेल्या अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत ही याबाबत झाली चर्चा
मुंबई पालिकेतील विविध समित्यांसाठी अर्ज दाखल केलं जाणार
उद्या सकाळी 11.30 वाजता भाजप आणि शिवसेना सदस्य अर्ज भरणार
स्थायी आणि शिक्षण समितीसाठी भाजप अर्ज दाखल करणार
उद्या ठरणार स्थायी समितीसह महत्वाच्या समित्यांचे कारभारी
नवी मुंबईतील बेलापूर मधील अनेक वर्ष जुन्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली.
राज्याचे पुनर्वसन मंत्री पंकज भोयर यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आमदार मंदा मात्रे यांनी बेलापूर मधील हजारो जुन्या झोपडपट्टी चा पुनर्वसन होणार असून झोपड्या मध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोफत घर मिळणार आहे.
ज्यांच्याकडे अधिकृत कागदपत्र आहेत त्यांना मोफत आणि ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीयेत एखादा पुरावा असेल त्यांना अडीच लाखांचा मोबदला यातून मिळणार असल्याची माहिती आमदार मंदा मात्रे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री आणि MMRDAचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 160 वी वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक झाली...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यंदा प्रथमच शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
मुंबई आणि परिसराच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 48 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली..
सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय ..
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी 353 कोटी 23 लाखांची मंजूरी ..
चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभार
मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द
आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय
जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा शासनादेश जारी
उच्च न्यायालयाने मुस्लीम आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सरकारचा निर्णय
मुस्लीम आरक्षणाचा शासन निर्णय 12 वर्षांनी रद्द