बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
महानगर पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात.. विदर्भातील चारही पालिकेत भाजप शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब मात्र अद्याप जागा वाटप फॉर्म्युला निश्चित नाही.
महायुती करायची की स्वतंत्र लढायचं यावर तोडगा काढत असताना भाजप शिवसेना युती संदर्भात आणि जागावाटप संदर्भात भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे विशेष लक्ष देत आहे. जागा वाटपा संदर्भात आणि युती संदर्भात एक दिवस आधी दिवसभर मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या बैठका झाल्या आता कोणकोणत्या जिल्ह्याचा तोडगा निघणार हे पाहणे महत्त्वाचे. रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू असल्याने चंद्रशेखर बावनकुळे संभाजी नगरात मुक्कामी आहेत.
हिंगोली शहरातील शाळेच्या कामाची पाहणी करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती या मृत्यूला महावितरण कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने मयताच्या वारसांना आठ लाख पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई त्याच्या आदेश हिंगोली जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत
वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील सनगाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या मामा सह दोन तरुण भाच्याचाही धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मृतदेह शोध पथकाकडून बाहेर काढण्यात आलेत. तीनही तरुणांच्या मृत्युनं गावावर शोककळा पसरलीये.