Latest Marathi News Update live 
ताज्या बातम्या

Latest Marathi News Update live : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात

Lokshahi Marathi Live Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक 24 फेब्रुवारी 2026, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Varsha Bhasmare

MSRTC : लालपरी अब दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत, प्रवाशांना मिळणार सुव्यवस्थित सेवा

महाराष्ट्रातील दुर्गम खेडे आणि आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी बस सेवा पोहोचवण्याचे स्वप्न आता सत्यात उतरू लागले आहे.

राज्य परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, “आता केवळ गावात एसटी नसेल तर आदिवासी पाड्यातही एसटी सेवा पोहोचणार आहे.

” हा निर्णय महाराष्ट्रातील दुर्गम भागांतील विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

BMC Budget 2026 : BMC बजेट उद्या! 'या' विभागांना मिळणार ऐतिहासिक निधी

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. यात पुढील क्षेत्रांनी भरीव निधी मिळण्याची शक्यता आहे.

Kerala : केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळचे नाव बदलून केले ‘केरळम’

नवी दिल्ली – केरळचे अधिकृत नाव आता ‘केरळम’ केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिली आणि सांगितले की, भाषेच्या आधारे राज्याचे नाव बदलण्याच्या मागणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे बदल राज्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक ओळखीला अधिक योग्य ठरेल, असे अधिकारी म्हणाले.

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना मोदी सरकारकडून महत्त्वाची जबाबदारी; सिंगापूर दौऱ्यात खासदारांचा नेतृत्व!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सिंगापूर (Singapore) देशासोबत होणाऱ्या व्यावसायिक चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी खासदारांचा एक विशेष गट नेमण्यात आला असून, या गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत.

Anil Ambani : अनिल अंबानींना मोठा कायदेशीर धक्का! मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी सोमवारी मोठा कायदेशीर धक्का बसला.

मुंबई उच्च न्यायालयाने बँकांना फसवणुकीच्या आरोपांवर कारवाई करण्यापासून रोखणारी अंतरिम स्थगिती रद्द केली आहे.

या निर्णयामुळे बँकांना त्यांच्या कंपन्यांची खाती ‘फसवी’ म्हणून वर्गीकृत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

President Droupadi Murmu at Shegaon : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगावात! संत गजानन महाराजांचे दर्शन, कडक बंदोबस्त

Droupadi Murmu द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव भेटीमुळे Shegaon शेगाव शहरात उत्साहासोबतच कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी रोजी त्या बुलढाणा जिल्ह्यातील महाआरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत.

Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीची चर्चा करा! विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक

महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र विधानमंडळ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर तातडीने चर्चा करण्याची जोरदार मागणी केली.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात

राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा