राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हिंगोलीत रात्री अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
ब्रिटिश एअरवेजचे विमान नागपूरात 26 तास अडकले. खराब हवामानामुळे विमान पहाटे नागपूरात उतरवण्यात आले.
शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाला आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड उद्या मुंबईत होणार असून प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडणार असून प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते सुनेत्रा पवारांची निवड होणार आहे.
भाजपचे नवनिर्वाचित महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी दाखल
यवतमाळ जिल्ह्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावच्या दौऱ्यावर असून 'आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबीरा'चे राष्ट्रपतींच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी रामदास तडस यांची निवड करण्यात आली असून रामदास तडस यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदार संघात एसीबीकडून कारवाई करण्यात आली असून रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकली आहेत.
आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून या बीएमसीच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.