रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले असून DGCA विरोधात तक्रार दाखल करणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील नवनिर्वाचित 23 नगरसेवकांविरोधातील तक्रारी आल्या असून या तक्रारींविरोधात प्रशासनाकडून शहानिशा सुरू झाली असल्याची माहिती मिळत आहे.
नागपूर महापालिका आता वाहने खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपूर महानगर पालिका महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्तांसाठी वाहने खरेदी करणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. काल रायगड जिल्हा परिषदेबाबत नंदनवनवर बैठक झाली. या सुनील तटकरे, उदय सामंत, एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री ही बैठक पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक आज पार पडणार आहे. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.
ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची आज बैठक होणार असून सकाळी 10 वाजता विधानभवनात ही बैठक होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे.