Latest Marathi News Update live  
ताज्या बातम्या

Latest Marathi News Update live : धुळे जिल्ह्यातील नरडाणा परिसरात अवकाळी पाऊस

Marathi Live Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक 27 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Siddhi Naringrekar

Shivsena : शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनात जाणार

शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनात जाणार असून दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक जाऊन नोंदणी करणार आहेत.

State Cabinet meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक होणार असून बैठकीतल्या निर्णयांकडे लक्ष लागले आहे.

Pollution : वायू प्रदूषणावर आज पुन्हा होणार सुनावणी

वायू प्रदूषणावर आज पुन्हा सुनावणी होणार असून नवी मुंबई मनपा आयुक्तांना कोर्टाकडून अल्टीमेटम देण्यात आला होता.

Meeting : आज सकाळी ११ वाजता दिल्लीत सर्वपक्षीयांची बैठक

आज सकाळी ११ वाजता दिल्लीत सर्वपक्षीयांची बैठक होणार असून उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे.

Pune : पुण्यात चाललंय तरी काय? आईकडून मुलगा आणि मुलीवर हल्ला

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात आईकडून मुलगा आणि मुलीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Big Breaking : भारत- युरोपीयन महासंघात ऐतिहासिक करार

Mumbai Accident: मुंबईत भरधाव स्कूल बसची महिलेला धडक

दक्षिण मुंबईच्या खेतवाडी परिसरातील घटना

स्कूल बसने 50 वर्षीय महिलेला चिरडलं

जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

स्कूल बसचालक पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादीकडून निलेश निकम यांची गटनेतेपदी निवड

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश निकम यांची गटनेते पद म्हणून निवड

पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निकम यांची निवड

आज पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सर्व नव निर्वाचित नगरसेवकांची बैठक संपन्न…

बैठकीतून निलेश निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब…

Mumba Politics: मुंबई महापालिकेत पराभुत उमेदवारांची मुंबईत कांग्रेसच्या कार्यालयात बैठक

पराभवाची कारणमीमांसा करताना स्थानिक पातळीवर काय घडले समजुन घेत वर्षा गायकवाड अमित पटेल यांनी साधला संवाद

*अनेक ठिकाणी काँग्रेस पदाधिकार्यांनी पक्षाविरुद्ध काम केल्याचे पुरावे वर्षा गायकवाड यांना देण्यात आले*

स्थानिक मतदारांच्या यादीत घोळ पहायला मिळाले मतदान केंद्र बदलल्याने मतदानावर परिणाम

वंचितच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केल्याने मोठं नुकसान झालं

५ जागी काँग्रेसच्या विरोधात वंचितांच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केल्याने मोठ नुकसान झाल्याची भावना

पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सातारा गॅजेट लागू करण्यास अडचणी

अशात, फक्त इंटरप्रिटेशनचा भाग असल्याने यासंदर्भात देखील लवकरच निर्णय होणार

समज-गैरसमज दूर करत मराठा आरक्षणासंदर्भात सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात हालचाली

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मंत्रालयात संपन्न

उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात बैठक

Latest Marathi News Update: तपोवन प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली

या प्रकरणात एकाच वेळी राष्ट्रीय हरित लवाद (NGT) आणि उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असण्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली

“प्रकरण एकतर NGT मध्ये चालवा किंवा उच्च न्यायालयात...

दोन्हीकडे सुनावणी झाली आणि वेगवेगळे निकाल लागले तर काय?

निकाल परस्परविरोधी आले तर काय?” असे परखड निरीक्षण न्यायालयाने नोंदवले

समान प्रकरणावर दोन न्यायालयांत सुनावणी झाल्यास विरोधाभासी निर्णयांची शक्यता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले

न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब केली

पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे

Solapur: सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा मुहूर्त अखेर ठरला

- 6 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार

- अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी हे पिठासीन अधिकारी म्हणून पाहणार काम

- मात्र सोलापूरचा महापौर कोण होणार याबाबत भाजपाचे सस्पेन्स कायम

- त्यामुळे आता सोलापूरच्या महापौर पदी कोणाची वर्णी लागणार याकडे समस्त सोलापूरकरांचे लक्ष

Dhule: धुळे जिल्ह्यातील नरडाणा परिसरात अवकाळी पाऊस

• दुपारी अचानक पावसाची हजेरी

• पावसामुळे शेतकरी व नागरिकांची धावपळ

• अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका...

• तीन-चार दिवसांपासून धुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण

• हरभरा व गहू पिकांवर अळीचा वाढता प्रादुर्भाव होण्याची शक्यता

धाराशिव जिल्ह्यातील मुरूम नगर परिषद मुख्याधिकाऱ्यावर आंबेडकरी तरुणांनी केली शाईफेक

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याने धाराशिवच्या मुरूम मधील भीम सैनिक झाले आक्रमक

मुरूम नगर पालिका मुख्य अधिकाऱ्याला आंबेडकरी तरुणांनी जाब विचारत घातला घेराव

मुरूम नगरपालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नसल्याने नगर पालिकेत घुसून आंबेडकरी तरुणांचे सुरूय आंदोलन

या घटनेची गांभीर्याने दखल घेत मुरूम नगर पालिका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आंबेडकरी तरुणांचा इशारा

भाजपच्या उमेदवाराने धरली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची कॉलर

अर्ज मागे घेण्यासाठी महेश गाडे यांनी धरली कॉलर

निवडणूक निर्णय अधिकारी भाजपला मॅनेज

राष्ट्रवादीचे उमेदावर राजेंद्र लवंगारेंचा आरोप

अर्ज माघारी घेण्यासाठी भाजपचे उमेदवार महेश गाडे यांनी धरली राष्ट्रवादी गटाच्या उमेदवाराची कॉलर.

निवडणूक निर्णय अधिकारी भाजपला मॅनेज-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजेंद्र लवंगारे यांचा आरोप.

माझ्या जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याची लवंगारे यांची मागणी

जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी...श्रीनगर विमानतळावरून सर्व विमानसेवा रद्द...

आज आणी उद्याला श्रीनगर विमानतळावरून असणाऱ्या सर्व विमानसेवा रद्द.....आज श्रीनगर विमानतळा वरून उडणारे सर्व आठही विमान केले रद्द

श्रीनगर- जम्मू, आणी दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बर्फ असल्यामुळे रस्ते देखील बंद....

विमानसेवा आणी रस्ते बंद असल्याने पर्यटक जम्मू-काश्मीरात अडकले....

आता 29 तारखेला रात्री श्रीनगर विमानतळावरून विमानसेवा होणार सुरू..

झालेल्या बर्फवृष्टीचा पर्यटकांना मोठा फटका

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा