Latest Marathi News Update live  
ताज्या बातम्या

Latest Marathi News Update live : विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची उद्या दुपारी २ वाजता बैठक

Marathi Live Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Varsha Bhasmare

Parinay Fuke : परिणय फुके यांची मंत्रिपदाबाबत मिश्किल टोलेबाजी

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक आमदारांमध्ये नाराजी असल्याचे चित्र समोर येत आहे. अशातच भाजप नेते आणि आमदार परिणय फुके यांनी आपली नाराजी एका मिश्किल आणि विनोदी शैलीत व्यक्त केली आहे. भंडाऱ्यात पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःला फार दु:खी आमदार म्हणत उपरोधिक टोला लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणारे परिणय फुके यांनी ही खदखद भंडाऱ्यात पत्रकारांसमोर बोलून दाखविली. परिणय फुके यांनी हसत-हसत आपली प्रतिक्रिया दिली असली तरी, त्यानंतर कुठलं विभागाचे मंत्रीपद हवं असं पत्रकारांनी विचारले असता परिणय फुके यांनी...Beggars are not Choosers असं उत्तर देत सविस्तर बोलणे टाळलं असलं तरी परिणय फुके यांच्या अशा मिस्कील उत्तरानं पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला.

Cabinet Meeting : 'या' आठवड्यात कॅबिनेट बैठक होणार नाही, नेमकं कारण काय ?

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि निवडणुकीच्या धामधुमीमुळे या आठवड्यात होणारी राज्य मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) बैठक रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंत्री सध्या आपापल्या मतदारसंघात प्रचार आणि नियोजनामध्ये व्यस्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, सत्ताधारी आघाडीतील मंत्रीदेखील थेट मैदानात उतरले आहेत. प्रचारसभा, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद आणि रणनीती आखण्यात मंत्र्यांचा मोठा वेळ खर्च होत असल्याने कॅबिनेट बैठकीसाठी आवश्यक असलेली उपस्थिती आणि तयारी होणे कठीण ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Gig Workers Strike : गिग कामगारांचा आज देशव्यापी संप, ऑनलाईन सेवा ठप्प होणार

संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी समोर आली असून, ऑनलाइन डिलिव्हरी अॅप्स आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग कामगारांनी मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात कामबंद संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे ऑनलाईन डिलिव्हरीसह घरगुती सेवा, दुरुस्ती सेवा आणि वैयक्तिक सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. गिग कामगारांचे म्हणणे आहे की, त्यांना ना स्थिर वेतन मिळते, ना सुरक्षित आणि सन्मानजनक कामाचे वातावरण. अनेक वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या आयडी ब्लॉक करण्यात येतात, ज्यामुळे त्यांचे उपजीविकेचे साधन एका क्षणात हिरावले जाते. याच अन्यायकारक धोरणांविरोधात गिग कामगारांनी आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Metro 4 News : प्रवास होणार सुसाट! मेट्रो 4 चा मोठा टप्पा पूर्ण, मुंबई–ठाणेकरांना दिलासा

मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो मार्गिका 4 ने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला असून, या प्रकल्पामुळे भविष्यातील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. भांडुप पश्चिम येथे तब्बल 325 मेट्रिक टन वजनाचे तीन भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लाँच करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया अत्यंत जटिल आणि तांत्रिक स्वरूपाची असून, आठ हेवी ड्युटी क्रेन्स आणि 12 मल्टी-अ‍ॅक्सल वाहनांच्या मदतीने हे काम पार पाडण्यात आले.

या कामासाठी एमएमआरडीएने महानगरपालिका (BMC), बेस्ट, भांडुप वाहतूक पोलीस, भांडुप पोलीस तसेच स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांशी समन्वय साधत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. विशेष म्हणजे, चार रात्री लागणारे हे काम केवळ दोन रात्रींमध्ये पूर्ण करण्यात आले. या मोहिमेत 35 अभियंते, 100 हून अधिक कुशल कामगार, 70 वाहतूक वॉर्डन आणि 25 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी सहभागी होते. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची विशेष दक्षता घेण्यात आली.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमधील पूछं मध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी ... सध्या बर्फवृष्टी हटवण्याचं काम सुरु

जम्मू-काश्मीर राज्यातील पूछं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी सुरू आहे. हिवाळ्याच्या या जोरदार पावसामुळे रस्ते बंद झाले आहेत आणि लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण झाले आहेत. प्रशासनाने त्वरित बचाव कार्य सुरू केले असून, रस्ते, पूल आणि महत्वाच्या वाहतूक मार्गांवरून बर्फ काढण्याचे काम सुरु आहे. स्थानीय प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन दल (Disaster Management Force) यांनी सांगितले की, बर्फवृष्टीमुळे काही गावांमध्ये संपर्क तुटला असून, लोकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. राज्याचे प्रशासन सतर्क असून, बर्फ हटवण्याचे काम 24 तास सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Mumbai Pollution : मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली; AQI पुन्हा 141 वर

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळण्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील भागांमध्ये प्रदूषणाचा कहर पाहायला मिळतो आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून वायुप्रदूषणाचे प्रमाणही झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे. मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे.

Jay Pawar : 'डॅड, काश वेळ थांबली असती...'; जय पवार यांची भावनिक पोस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता जय पवार यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जय पवार म्हणाले की, 'डॅड, काश वेळ थांबली असती... मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो.' असे म्हणत जय पवार अजित पवार यांच्या सोबतच फोटो पोस्ट केला आहे.

Air India : एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड, उड्डाणावर अडथळा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर विमान सुरक्षा आणि तांत्रिक समस्यांवर चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाच्या इंधन नियंत्रण स्विचमध्ये पुन्हा बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या तांत्रिक समस्येमुळे विमानाचे उड्डाण थांबवावे लागले आणि विमान ग्राउंड करण्यात आले. एअर इंडियाकडून दिलेल्या माहितीनुसार, विमानातील एका वैमानिकाने इंधन स्विचमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची तक्रार केली होती. प्राथमिक तपासणीनंतर विमान ग्राउंड करण्यात आले. या विमानात सुमारे २०० प्रवासी होते. पायलटच्या तक्रारीनंतर विमान कंपनीने तातडीने संपर्क साधला आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांना घटनाक्रमाची माहिती दिली.

Mumbai Local : मुंबई–महाराष्ट्र रेल्वे नेटवर्कला नवे बळ; कनेक्टिव्हिटी, लोकल आणि स्टेशन विकासावर मोठा भर

भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, याचा थेट फायदा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. ईस्ट–वेस्ट कनेक्टिव्हिटी स्पेशल कॉरिडॉर अंतर्गत रेल्वे मार्ग अधिक सक्षम करण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे देशातील मालवाहतुकीत मोठी वाढ करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. औद्योगिक व व्यापारी दृष्टीने हा कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या नव्या कॉरिडॉरमुळे बंदरे, औद्योगिक क्लस्टर आणि प्रमुख लॉजिस्टिक हब एकमेकांशी थेट जोडले जाणार आहेत. परिणामी, मालवाहतुकीचा वेळ कमी होऊन खर्चात बचत होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना गती मिळणार असून रोजगारनिर्मितीला देखील चालना मिळेल.

Mumbai Railway : ‘तेजस’सह अनेक एक्स्प्रेस दादरहून सुटणार; सीएसएमटीचे दोन प्लॅटफॉर्म ८५ दिवस बंद

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम करणारी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर पुढील तीन महिने मोठा जम्बो ब्लॉक जाहीर करण्यात आला असून, याचा थेट परिणाम लोकल तसेच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे. या निर्णयामुळे काही लोकल सेवा दादर ते ठाणे दरम्यानच धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Mumbai : मुंबईत ड्रेनेजमध्ये सफाई करणाऱ्या मजुराचा गुदमरून मृत्यू

मुंबईत ड्रेनेजमध्ये सफाई करणाऱ्या मजुराचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोरेगाव मेगा मॉलजवळ ड्रेनेज साफ करताना ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे.मध्यरात्री 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून दोन मजूर ड्रेनेजमध्ये सफाई करताना गुदमरले. यामधील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या मजुरावर सध्या जोगेश्वरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघंही मजूर खाजगी कंपनीसाठी काम करत असल्याची माहिती मिळत आहे.

Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; लातूर दौरा तात्पुरता बंद

भाजप नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक बातमी समोर येत आहे. समावेश आहे. मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे त्यांना त्यांचा हेलिकॉप्टर प्रवास पुढे ढकलावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे संभाजीनगरहून लातूरला हेलिकॉप्टरने जाणार होत्या. परंतु, पायलटने तांत्रिक बिघाडाची आगाऊ तक्रार केल्याने त्यांना त्यांचा प्रवास पुढे ढकलावा लागला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी प्रचार सभेला सुरुवात केली आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप मोठ्या ताकतीने उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. किनगाव गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ किनगाव येथे आज सकाळी १२ वाजता पंकजा मुंडे यांची प्रचार सभा होणार होती.

America: अमेरिकेने टॅरिफ कमी करताच सोने-चांदीच्या भावात मोठी उसळी

सोने-चांदीच्या भावात मोठी उसळी;

एक किलो चांदीचा दर तब्बल 20 हजारांच्या आसपास वाढला

एक किलो चांदीचा दर अडीच लाखांच्या पार

आज बाजार उघडताच सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल साडेचार हजार रुपयांनी वधारला

10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 48 हजार रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दीनिमित्त देशभरात संवाद कार्यक्रम

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी निमित्त देशभरात संघाकडून संवाद कार्यक्रम घेतला जात आहे

- बंगलोर, दिल्ली आणि कोलकता येथे संवाद कार्यक्रम झालेला आहे, आता शेवटचा टप्पा मुंबईत आहे

- 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी सरसंघचालक मोहन भागवत मुंबईत काही प्रमुख निमंत्रित व्यक्तींशी संवाद साधतील

- नेहरू सेंटरला हा कार्यक्रम होईल

- 800 ते 900 व्यक्ती संवादाला उपस्थित राहतील

Andheri: अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला परिसरात मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मोठा गोंधळ

2023 पासून एका अंतर्गत रस्त्यावर जड गर्डर ठेवण्यात आले असून सुमारे 350 मीटरचा रस्ता आणि दोन लेन बंद

गर्डरमुळे रस्त्याची मोठी दुरवस्था, खड्डे आणि अस्वच्छता वाढली असून परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार

पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून फुटपाथच उपलब्ध नसल्याने जीव धोक्यात

Wardha: वर्ध्यातील आष्टी पुलगाव मार्गावर ट्रकचा अपघात

रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीचा काही काळ झाला खोळंबा

वर्ध्याच्या आष्टी पुलगाव मार्गावर तळेगांव येथे रोडच्या डिव्हायडर ला धडकून ट्रक झाला पलटी सुदैवाने जीवितहानी नाही

वर्ध्याच्या आष्टी पुलगाव मार्गावर तळेगांव येथे रोड डिव्हायडर ला धडकून ट्रक झाला पलटी असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, तळेगाव रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीचा काही काळ खोळंबा निर्माण झाला होता.

सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळावं यासाठी पक्षातील आमदारांकडून पाठिंबा

पक्षातील ३० पेक्षा अधिक आमदारांकडून सुनेत्रा पवार यांच्या नावालाच पसंती

आमदारांकडून पाठिंबा दर्शवण्यासाठी घेतल्या सह्या, विश्वसनीय सूत्रांची माहिती

३० पेक्षा अधिक आमदारांकडून सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यासाठी पाठिंबा

काही "ठराविक" आमदार वगळता ३० पेक्षा अधिक आमदारांकडून सुनेत्रा वाहिनी यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यासाठी पाठिंबा

Jalna: जालन्यात ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी बनावट वेबसाईट तयार करुन फसवणूक

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी बनावट वेबसाईट तयार करणारा गुवाहाटी येथिल तरुण वाराणशी मधून ताब्यात

जालना आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांची मोठी कारवाई

पाच तारखेपर्यंत सदरील आरोपीला सुनावण्यात आली पोलीस कोठडी

Baramati: बारामतीमध्ये निवडणूक काळात धारदार हत्यारांसह तरुण जेरबंद

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला तलवार व कोयत्यासारखी धारदार हत्यारे बाळगताना रंगेहाथ पकडले आहे..

ही कारवाई रूई परिसरात करण्यात आली.

ओंकार रामचंद्र काळे असे आरोपीचे नाव आहे.

Nanded: नांदेडमध्ये हरडपमध्ये ऊसतोड कामगार आणि गावकऱ्यांमध्ये वाद

रस्त्याच्या खाली गाडी घेण्याच्या कारणावरून गावकरी आणि ऊसतोड कामगारांमध्ये वाद....

रुग्णाला घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनाला ऊसतोड कामगाराच्या बैलगाड्याने वाट मोकळी करून न दिल्याने झाला वाद.

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हरडप येथे ऊसतोड कामगार व गावकऱ्यांमध्ये राडा.

ऊसतोड कामगार हातात कोयता घेऊन पाठलाग करतानाचा व्हिडिओ व्हायरल.

ऊसतोड कामगाराची विरोधात हदगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली तक्रार

Pune: पुण्यात झेडपी निवडणुकीसाठी 23 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या कामकाजाकरिता जिल्ह्यात १३ तालुक्यात एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार .

वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत आहे. नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भाजपचा महानगरपालिकेतील नगरसेवक बिनविरोधचा पॅटर्न महापौर निवडणुकीतही

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना महापौर पदाची लॉटरी...

पुण्यात मंजुषा नागपुरे तर पिंपरी चिंचवड मध्ये रवी लांडगे यांना महापौर पदाची मिळाली आहे संधी...

नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेत पुण्यातून मंजुषा नागपुरे या प्रभाग क्रमांक 35 मधून बिनविरोध तर पिंपरी चिंचवड मधून प्रभाग क्रमांक ६ मधून रवी लांडगे बिनविरोध

त्यामुळें भाजपने लोकांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांना महापौर पदी का बसवले नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..

विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची उद्या दुपारी २ वाजता बैठक

सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना समितीकडून नोटीस

बैठकीसाठी हजर राहण्याचे समितीकडून आदेश

अशात, उद्या कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे हजर राहणार का? हे बघणं महत्त्वाचे असेल

कुणाल कामराकडून एकनाथ शिंदेंविरोधात बनवलं होतं गाणं तर त्याला अंधारेंकडून समर्थन देण्यात आलं होतं

Amravati: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

ढेप बनवणाऱ्या फॅक्टरीत अचानक आग लागल्याने मोठे नुकसान.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे पथक दाखल.

अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती नाही

ॲड. रविंद्र पगार यांचं अल्पशा आजाराने निधन

रविंद्र पगार राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष

नाशिकच्या उत्राने येथे उद्या होणार अंत्यविधी

मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला

७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार

११ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा केली जाणार

११ फेब्रुवारी रोजीच दुपारी १२ वाजता विशेष सभेचं आयोजन

महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह भरण्याच्या १५ मिनिटं आधी असणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा