Latest Marathi News Update live  
ताज्या बातम्या

Latest Marathi News Update live : गोविंद बागेत पवार कुटुंबाची बैठक पार

Marathi Live Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक 30 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Siddhi Naringrekar

Mumbai : आज सकाळी 11 वाजता महापौर व उपमहापौर पदाकरिता अर्ज भरण्यात येणार

आज सकाळी 11 वाजता महापौर व उपमहापौर पदाकरिता अर्ज भरण्यात येणार असून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात पहिल्या मजल्यावर फॉर्म भरले जाणार आहेत,

Devendra Fadnavis : यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता

यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असूनअजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा असल्याची माहिती मिळत आहे.

NCP : राष्ट्रवादीने जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचार थांबवला

राष्ट्रवादीने जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचार थांबवला असून अजित पवारांच्या निधनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो होणार नाहीत.

Chhatrapati Sambhajinagar :  छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपात अंतर्गत गटबाजी

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये महापौरपदाच्या निवडीवरून अंतर्गत गटबाजी पाहायला मिळत आहे.

Nashik : नाशिकमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय बोरस्ते यांची नियुक्ती 

नाशिकमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय बोरस्ते यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे.

Sunetra Pawar : ‘सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करा’; राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रस्ताव

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या बारामतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा यांसारखी अत्यंत महत्त्वाची खाती होती. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महायुती सरकारसमोर प्रशासकीय आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाबाबत आणि मंत्रिपदांच्या पुनर्वाटपाबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

MHADA Lottery 2026 : सर्वसामान्यांसाठी हक्काच्या घराची सुवर्णसंधी; मुंबई-उपनगरात ७ हजार घरांची म्हाडा लॉटरी लवकरच


सर्वसामान्यांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच साकार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (MHADA) मुंबई आणि उपनगरात तब्बल ७ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळासह कोकण मंडळाकडून ही बहुप्रतिक्षित सोडत जाहीर होणार असून, मार्च २०२६ मध्ये लॉटरी प्रक्रिया पार पडण्याची अपेक्षा आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला ब्रेक? महिला व बालकल्याण विभागाची कठोर कारवाई

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जात होती. या योजनेमुळे महायुती सरकारला महिलांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, योजनेचा वाढता आर्थिक भार आणि अर्जांतील अनियमितता यामुळे आता शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Praful patel : उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा ट्विस्ट, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं? प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘आमचे नेते अजित पवार यांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नव्हती. राजकीय दृष्टीने आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा अजित पवार यांच्याकडे होती. त्या जागेचा आम्हालाही निर्णय करावा लागणार आहे, म्हणून त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की, येत्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर निर्णय आम्हाला करायचा आहे. यासाठी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून, जनभावनेचा आदर करून, अजित दादांची आमच्या पक्षात महत्त्वाची भूमिका होती या सर्वांचा विचार करून आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं आहे.’

Sunil tatkare : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तटकरे यांची प्रतिक्रिया काय?

पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ‘दादांच्या अकाली जाण्याचा धक्क्यातून आम्ही कोणीच सावरलेलं नाही. दादा आमच्यातच आहे असं वाटतं. या शोकमग्न अवस्थेत आम्ही आहोत. आज त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणं माझ्यासाठी क्लेशकारक आहे. ज्या कार्यालयात पक्षाचं संघटन उभं केलं, तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याच्या भावनेतून मी इथे आलो होतो.’

Chhनवले पुलावरील वाहतूक काही काळासाठी राहणार बंदagan Bhujbal :  नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार? नेमकं काय म्हटले भुजबळ?  

‘अजितदादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले ते पाहून झोप उडाली.  शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवला पाहिजे.  उद्या विधान मंडळाचे सदस्य आहेत. त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात विधान मंडळ प्रमुखपद अजितदादांकडे होतं, ते पद कोणाकडे द्यायचं? याबाबत निर्णय होईल. सुनेत्रा ताईंकडे पद देण्याची मागणी आहे. ते रास्त आहे. टीव्हीलाही मी ऐकत आहे. ते काही चूक आहे असं वाटत नाही. त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. बैठकीत तो निर्णय होईल.

नवले पुलावरील वाहतूक काही काळासाठी राहणार बंद

पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्यासाठी ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत (दोन तास) साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांनी या सेवा रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या बार्शीतील नियोजित प्रचार सभा रद्द

बार्शीचे भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा रद्द करण्यास सांगितल्याने उद्याची सभा रद्द

शिवाय आज प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडण्याचा कार्यक्रम होता तो देखील रद्द करण्यात आल्याची भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती

‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मोठे नुकसान राज्याचे झाले आहे’

उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

नरेश अरोरा सुनेत्रा पवारांना भेटून मुंबईसाठी रवाना

राष्ट्रवादीकडून विधिमंडळाला पत्र पाठवण्यात येणार

उद्या सकाळी 11 वाजता आमदारांची बैठक

राष्ट्रवादीचे अनेक आमदार मुंबईच्या दिशेने रवाना

शिवसेना आणि भाजप नगरसेवकांची सोमवारी गटनोंदणी होणार

*शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक मुंबई महापालिका येथे जमणार आणि त्यानंतर एकत्रित कोकण भवन येथे जाणार*

*शिवसेना आणि भाजपची एकच गट म्हणून नोंदणी केली जाणार आहे*

*मुंबईत महापौर आणि स्टैंडिंग भाजपकडे उपमहापौर पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता*

*मुंबईत महापौर आणि स्टैंडिंग भाजपकडे उपमहापौर पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता*

*तर कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे येथे महापौर शिवसेने कडे जाण्याची शक्यता*

*सूत्रांची माहिती*

गोविंद बागेत पवार कुटुंबाची बैठक पार

बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार, उपस्थित.. शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत..सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती..

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा