सुनेत्रा पवार होणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री...संध्याकाळी 5 वाजता शपथविधी...सुप्रिया सुळे शपथविधीला उपस्थित राहणार, मात्र शरद पवार उपस्थित राहणार नाहीत
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी ठीक 2 वाजता विधानभवनात ही बैठक होणार असून, पक्षाच्या सर्व आमदारांनी आवर्जून उपस्थित राहावे, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जबाबदाऱ्यांची पुनर्रचना करत सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता राजभवनात होणाऱ्या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची राज्यसभेतील जागा रिक्त होणार आहे. या रिक्त जागेसाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्या नावाबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही सकारात्मक संकेत मिळाले आहेत. त्यामुळे राज्यसभेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असतानाच, त्यांच्या जागी कोण नेतृत्व करणार यावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने होत होती. अखेर आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणातच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रचंड वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर नेतृत्व, सत्ता आणि पक्षाच्या भविष्यातील दिशेबाबत चर्चा सुरू झाल्या असून, याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सांगलीमध्ये सध्या कृष्णामाई महोत्सव पार पडत आहे.त्यानिमित्ताने कृष्णा नदीच्या काठावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भजन, कीर्तनसह कृष्णमाईची महाआरती अशा पद्धतीचा सोहळा पार पडत असून वाराणसीच्या आर्चकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कृष्णामाई व गंगामाईची महाआरती पार पडली, ज्याला हजारो सांगलीकरांनी उपस्थिती लावली होती. शहरातल्या कृष्णा नदीच्या तिन्ही घाटावर पार पडणाऱ्या कृष्णामाई महोत्सवानिमित्ताने संपूर्ण कृष्णानदीचा घाट परिसर व ऐतिहासिक आयर्विन पूल विद्युत रोषणाईने झळाळून गेला आहे.शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आला असून तीन दिवस पार पडणाऱ्या महोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम देखील संपन्न होणार आहेत. या महोत्सवासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी देखील उपस्थिती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल, सत्तेतील जबाबदाऱ्या आणि भविष्यातील दिशा यावरून चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी 17 जानेवारी रोजी बारामतीतील गोविंद बाग येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. विशेष म्हणजे या बैठकीला स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही उपस्थित होते. या बैठकीचा उद्देश दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र आणण्याचा होता, अशी माहिती आता उघड झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. अवघ्या काही दिवसांतच सुनेत्रा पवार आज सायंकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या निर्णयामुळे पवार कुटुंबातील मतभेद पुन्हा चर्चेत आले असून, शपथविधी इतक्या घाईत का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या कोअर टीमने सुनेत्रा पवार यांना गटनेतेपद आणि उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय झटपट घेतला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशा चर्चा थांबवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी या प्रक्रियेला पुढे नेल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारण झपाट्याने बदलत आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार आणि पक्षाची पुढील दिशा काय असणार, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. याआधी सकाळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती आणि त्यावरचा निर्णय ठराविक तारखेला जाहीर होणार होता, असे स्पष्ट केले. तसेच सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजितदादा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणासाठी आग्रही होते. याविषयीच्या बैठकाही झाल्या.खासदार सुप्रिया सुळेही काही वेळा बैठकीला होत्या. या घडामोडींची प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ आणि अन्य आमदारांना कल्पना दिल्याचं माहिती दादांनी आपल्याला दिल्याचे जयंत पाटील यांनी दिली.
दिलीप वळसे पाटील सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. छगन भुजबळ या प्रस्तावाला अनुमोदन देतील. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड होईल. सुनेत्रा पवार देवगिरीवरुन निघाले आहेत.
दिलीप वळसे पाटील सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. छगन भुजबळ या प्रस्तावाला अनुमोदन देतील. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड होईल. सुनेत्रा पवार देवगिरीवरुन निघाले आहेत.
विजयगडावरील अजित पवारांची नावाची पाटी बदलली
विजयगड निवासस्थानाला श्रीमती सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडताच बदलली पाटी
भिवंडी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळाच्या बी. एन. एन. महाविद्यालयातील ग्रामीण विकास विभागाच्या वतीने कला–स्वाद महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे तसेच जीवनावश्यक साहित्याचे स्टॉल लावून विक्री केली.विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान, उद्योजकतेचे धडे आणि प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.यावेळी प्राचार्य डॉ. शशिकांत म्हाळुंकर, उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम, डॉ. निनाद जाधव, आदी मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला असून. या महोत्सवात विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकरांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश
आज रात्री देवगिरीवर घेणार भेट
लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती
सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारांसोबत होणार बैठक
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बैठक
लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती
मालेगाव नायट्रोजन गॅस सिलेंडर स्फोट प्रकरण –
मालेगावात नायट्रोजन गॅस सिलेंडरच्या स्फोट प्रकरणात दोघांना अटक
काल सकाळी प्रजासत्ताक दिनी फुगे फुगवत असताना स्फोटाची घटना
स्फोटात फुगे घेण्यासाठी थांबलेले पाच जण गंभीर जखमी
स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली
याप्रकरणी फुगे विक्रेत्यांना अटक करण्यात आली
पुढील तपास पोलीस करत आहेत
सिलेंडर स्फोटानंतर शहरात फुगे विक्रेत्यांची कसून तपासणी सुरू
दोन टप्यात पार पडणार अर्थसंकल्पीय अधिवेशन
निर्मला सितारमण तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार
28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा
9 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पुढचा टप्पा
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 30 बैठका होतील
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रचाराला वेग आला आहे. कोल्हापूर दक्षिण मतदार संघात भाजपचा महिला मेळावा पार आला. शौमिका महाडिक यांनी या मेळाव्यातून संबोधित केलं. नामदेव वाइंगडे यांच्यासह उचगाव आणि मुडशिंगी येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भाजप उमेदवारांना साथ द्या असं आवाहन या मेळाव्यातून करण्यात आलं. या मेळाव्यासाठी भाजपचे दक्षिण मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजलीही वाहण्यात आली.
पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणाचा किरणोत्सवाला फटका
ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव सोहळा होऊ शकला नाही
ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव सोहळा न झाल्यामुळे भाविकांची निराशा
अंबाबाई देवीचा उत्तरायण किरणोत्सव सोहळा 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी या दिवशी होतो सोहळा