बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्यांच्या नवीन गर्लफ्रेंडमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमिर नुकताच मुंबई एअरपोर्टवर त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत स्पॉट झाला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच आमिर खाननं आपली गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हिला मीडियासमोर अधिकृतरीत्या सादर केलं होतं. आमिरनं 60 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका खास समारंभात त्याने गौरीसोबतचं नातं उघड केलं.
त्यांचा मुंबई एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओत गौरी आमिरला एअरपोर्टवरून घ्यायला आली होती. आमिर जसा कारजवळ येतो, तसं गौरी पटकन दुसऱ्या सीटवर शिफ्ट होते आणि आमिरसाठी जागा करते. मात्र कॅमेऱ्यांकडे लक्ष जाताच ती आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते.