Abdul Sattar 
ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्याच्या मेळाव्यासाठी २५ हजार शिवसैनिकांना मुंबईत घेऊन जाणार- अब्दुल सत्तार

एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

Published by : shweta walge

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना परवानगी मिळाली आहे. येत्या विजयशमीला मुंबईत दोन वाजता दसरा मेळावा होणार आहे. तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर होणार आहे. याचं पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून तब्बल २५ हजार शिवसैनिकांना मुंबईत मेळाव्यासाठी घेऊन जाणार असे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दावा केला आहे.

पुढे म्हणाले की, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. जनसामान्यांत प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. त्यामुळे बिकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याची सभा ना भूतो ना भविष्यती अशी ऐतिहासिक होईल. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत आज शहरातील सेना भवन परिसरात मेळाव्याच्या पूर्वतयारी बाबत बैठक संपन्न झाली.

दरम्यान, मुंबईला जाण्यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली असून जेवण, चहा, पाणी, नास्ता यासह रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक यासारख्या आवश्यक सोयी सुविधा प्रवास दरम्यान शिवसैनिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे २० तास लोकांची कामे करतात, त्यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम राज्यात होत आहे. एकनाथ म्हणजे लोकनाथ अशी भावना जनसामान्यांतुन व्यक्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून प्रचंड संख्येने या, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत